मुंबई: व्हॉट्सअॅपने आणलेल्या नव्या स्टेटसला युजर्सनी म्हणावा तितका भाव दिला नाही. उलट अनेक युजर्सनी नव्या स्टेटस फीचरबद्धल नाराजीच व्यक्त केली. त्यामुळे व्हॉट्सअॅपनेही आपल्या युजर्सच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा एकदा जुनं स्टेटस फीचर सुरू केलं आहे. युजर्सच्या आग्रहास्तवच व्हॉट्सअॅपने हा निर्णय घेतला आहे.

स्मार्टफोन वापरणाऱ्या तरूण आणि अबालवृद्धांमध्ये प्रचंड मोठी क्रेझ असलेले व्हॉट्सअॅप म्हणजे अनकांसाठी जीव की प्राण. त्यात व्हॉट्सअॅपवरचा डीपी आणि स्टेटस हा अनेकांचा ‘स्टेट’स सिंबॉल. अनेकांच्या व्यक्त होण्याची सुरूवातच मुळी डीपी आणि स्टेटसमधून होते. म्हणूनच  व्हॉट्सअॅपने यात बदल करत अधिक व्याप्त स्वरूपाचं नवं स्टेटस फीचर सुरू केलं. मात्र, नवं फीचर वापरण्यास काहीसे क्लिष्ट असल्यामुळे युजर्सनी त्याकडे पाठच फिरवली. मग युजर्सच्या भावना विचारात घेण्याशीवाय व्हॉट्सअॅपकडे पर्यायच राहीला नाही.

व्हॉट्सअॅपकडून जुनं स्टेटस फिचर पुन्हा नव्याने सुरू केल्यावर अँड्रॉईड यूजर्संना अपडेट मिळणं सुरु झालं खरं. मात्र, या फिचरला About असं देण्यात आलं असून, हे स्टेटस वापरताना सेटींग्जमधून काही पर्याय सेट करावे लागणार आहेत. जुनं फीचर v2.17.107 अपडेटसह वापरलं जाऊ शकतं. (हेही वाचा,व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी दु:खदायक बातमी)

 कसं सुरु कराल जुनं स्टेटस फीचर?

  • जुनं स्टेट्स फीचर सुरू करण्यासाठी सेटिंग मेन्यूत जा.
  • मेन्युत गेल्यावर फोटोच्या खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल.
  • स्टेटस दिसले की, त्यावर टाईप करून तुम्ही तुमचं आवडतं स्टेटस एडीट करून ठेऊ शकता.
  • पूर्वीप्रमाणे तुम्हाला इथं Available, Busy, At school, At the movie. हे ऑप्शन सुद्धा दिसतील.
  • महत्त्वाचे असे की, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवं स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवं असलेलं फीचर निवडता येणे शक्य आहे.