व्हॉट्सअॅपवर गेले काही दिवस नव्या फिचरची टेस्टिंग सुरु आहे. ज्यामध्ये तुम्ही यूट्यूबचे विडिओंना डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअॅप चॅट विंडोमध्ये बघु शकता. एवढच नव्हे तर तुमचा कोणताही मित्र तुम्हाला युट्यूब व्हिडिओ पाठवू शकतो. हे पाहण्यासाठी तुम्ही त्यावर क्लीक केले की त्याच चॅटबॉक्समध्ये तो व्हिडिओ प्ले होईल.

teenager whatsapp

यात अनेक सुविधा पाहायला मिळणार आहेत. जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या चॅट विंडोमध्ये प्ले होत असेल तेव्हा तुम्ही तो झुम करुन पाहू शकाल. त्या व्हिडिओला तुम्ही फुल स्क्रीन मोडमध्येही पाहू शकता. चालू प्लेबॅकला बाजूला घेऊन चॅटचे अन्य मेसेजही वाचू शकता. सध्या तुम्ही चॅट सुरु असताना व्हिडिओ पाहायला गेलात तर तो बंद केल्याशिवाय तुम्ही दुसरे चॅट वाचू शकत नाही. ( ‘idea’ ची नवी ‘आयडिया’ : तब्बल 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग)

WhatsApp

हे फिचर फक्त iOS वरच उपलब्ध आहे. आयफोन 6 आणि त्यापेक्षा वरच्या मॉडेल्सवरच उपलब्ध आहे. एंड्र्इड आणि विंडोज फोन्सवर हे दिसत नाही. (नोकिया 105 आणि नोकिया 130 फोन नव्या अवतारात लॉन्च, किंमत केवळ 999 रूपये)

फोटो साभार - गेटी इमेज
फोटो साभार – गेटी इमेज

जर ही सुरु असलेली टेस्टिंग सफल झाली तर iOS यूजर व्हॉट्सअॅपच्या इन अॅप यूट्यूब प्लेबॅकची मजा घेऊ शकतात.