न्यू जर्सी: कोणतेही न्यूज चॅनल घ्या त्यावरून केवळ आणि केवळ न्यूजच प्रसारीत केल्या जातात. हे सत्य आहे आणि त्याला कोणी आक्षेपही घेऊ शकत नाही. पण, अमेरिकेत मात्र, एक चॅनल याला अपवाद ठरले आहे. या न्यूज चॅनलवर न्यूज ऐवजी चक्क पॉर्ण व्हिडिओ प्रसारीत झाला. तेही एक-दोन मिनिटे नव्हे. तब्बल 30 मिनिटे. विशेष म्हणजे न्यूज व्यवस्थापणाच्याही ही गोष्ट सुरूवातीला लक्षात आली नाही. मात्र, अचानक टेलीफोनची घंटी वाजाय लागल्यावर मात्र, प्रशानसाची एकच तारांबळ उडाली. चॅनलने प्रोग्रामिग डिपार्टमेंटला याबाबत जबाबदार ठरविले आहे. न्यू जर्सी येथील केबल टीव्ही प्रोव्हाईडर आरसीएनच्या चूकीमुळे हा प्रकार घडल्याचे चॅनलने म्हटले आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा…)

प्राप्त माहितीनुसार गेल्या रात्री, प्रेक्षकांनी टीव्ही सुरू केला. सवईने त्यांनी आपले आवडते चॅनल लावले. मात्र, त्यानंतर त्यांना टीव्हीच्या पडद्यावर जे दिसले ते पाहून त्यांना जागेवरच घाम फुटला. आता त्यांना चक्कर येणेच बाकी होते. सीएनएन चॅनलवरून रात्रीच्या वेळी ‘एंथनी बर्डन्स’चा शो प्रसारीत होतो. हा शो पाहणारा वर्ग मोठा आहे. दरम्यान, त्या दिवशी मात्र आक्रीत घडले. एंथनी बर्डन्सच्या शो ऐवजी पूर्ण 30 मिनीटे पॉर्न मुव्हीचे प्रक्षेपण झाले. प्रोग्राम हेडची चूक असल्याचे चॅनलने सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही चूक सुधारण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी कसा लागला, असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत.

सीएनएन चॅनलने आर्धा तास अपत्तीकारक व्हिडिओ प्रक्षेपीत झाल्याबद्धल आरसीएनकडे खुलासा मागितला आहे. प्राप्त माहितीनुसार चॅनलची ही चूक केवळ बोस्टनच्या प्रेक्षकांनाच दिसली. प्रसारमाध्यमातून प्रक्षेपीत झालेल्या बातम्यांनुसार न्यू जर्सी येथील केबल टीव्ही प्रोव्हायडर आरसीएनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. (हेही वाचा, पुण्यातील कर्वे रोडवर भरदिवसा सुरु झाले पॉर्न)

CNN वर् पॉर्न व्हिडिओ दिसल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रीया
CNN वर् पॉर्न व्हिडिओ दिसल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रीया

दरम्यान, बोस्टनमध्ये आरसीएनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर जेफ कार्लसन यांनी सांगितले की, घडलेल्या प्रकारबद्धल चौकशी सुरू आहे. तसेच, बोस्टनमध्ये आर्धातास पॉर्व व्हिडिओ चॅनलवरून प्रक्षेपीत केल्याची पूर्ण माहिती नाही.

CNN वर् पॉर्न व्हिडिओ दिसल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रीया
CNN वर् पॉर्न व्हिडिओ दिसल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रीया

विशेष म्हणजे ज्या रात्री हा प्रकार घडला त्या रात्री New York Daily News नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. जो या वृत्ताशी संबंधीत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून, अनेकंनी पाहिला आहे. केवळ अर्धातासाच्या कालावधीतच हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. डेली मेल युके डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.