जगाने जागतिकीकरणानंतर विज्ञानवादाची कास धरली आणि प्रगती सुरू केली. भारतही डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय समाजही बदलाच्या दिशेने कूच करत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्था असो की, भारतातील अनेक मंदीरांचे डिजिटलायजेशन. सर्वच बाबतीत भारत आधुनिक होत आहे. परंतु, अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडणे भारताला अद्यापही जमले नाही. लोकांच्या अज्ञानाचा, गरिबिचा, अपरिहार्यतेचा फायदा घेत आजही भोंदू बाबा लोकांना वेटीस धरत आहेत. स्त्री-पूरूषांचे शोषण करत आहेत. महिला, मुलींच्या बाबतीत तर, हे भोंदू बाबा अधिकच गैरफायदा घेतात. लखनौमधील एका घटनेतून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका मुलीच्या अपरिहार्यतेचा एक भोंदू बाबा कास गैरफायदा घेत आहे, हे एका व्हिडिओतून पुढे आले आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक अंबटशौकीन लोक हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. पण, केवळ अंबटशौकीन म्हणून या व्हिडिओकडे न पाहता. समाजातील वास्तव आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील या विचारातून हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे.

युट्युबवर असलेला हा व्हिडिओ लखनौ येथील असल्याचे सांगीतले जात आहे. इंडिया डॉट कॉम या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, समाजात घडणाऱ्या अनुचीत गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ आम्ही येथे देत आहोत. जेणेकरून आपणही अशा भोंदू बाबांपासून दूर रहाल आणि इतरांनाही दूर राहण्यास प्रवृत्त कराल. या व्हिडिओत सरळ सरळ दिसत आहे की, एक भोंदू बाबा असहाय मुलीला लौंगिक संबंध प्रस्तापित करण्यासाठी कसे उत्तेजीत करतो आहे. हा बाबा या मुलीशी असे बोलताना दिसतो आहे की, जेणेकरून मुलीचे मन परिवर्तन होईल व  ती आपल्या जाळ्यात येईल.

मुलीने आपल्यासोबत शारीरीक संबंध बनवावेत यासाठी हा बाबा धार्मिक आणि अध्यात्मीक उपदेशाचे डोसही या मुलीला पाहताना दिसतो. तो पीडित मुलीला सांगतो आहे की, तुझी पिढा दूर करण्यासाठी तुला काहीतरी करावी लागेली. तुझ्या गुप्तांगात सर्व कृपा अडकली आहे. ही कृपा मुक्त करायची असेल तर, तुला मी सांगतो ते करावे लागेल. इतकेच नव्हे तर, या बाबाच्या फालतू आणि अश्लिल डायलॉगबाजीला मुलगी भीक घालत नाही हे दिसताच त्याने आपला पवित्रा बदलला आहे. हा भोंदू बाबा तिला पैशांचे अमिश दाखवण्याचाही प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहे. हा बाबा या मुलीला अमिश दाखवत आहे की, तू जर माझ्यासोबत राहिली आणि पती-पत्नी सारखे संबंध ठेऊन राहिलीस तर, मला मिळणाऱ्या पैशातील 50 टक्के वाटा तूझा 50 टक्के माझा.(हेही वाचा, तिच्यासोबत काय होतंय? नशेच्या भरात तिला कळलंही नाही (व्हिडिओ))

दरम्यान, या भोंदू बाबांचा पर्दापाश करण्यासाठी मुलीने या सर्व प्रकाराचे व्हिडिओ शुटींग केले आहे. हेर्व शुटींग मोबाईलमध्ये झाल्याचे दिसते. दरम्यान, या मुलीच्या गुप्तांगात काही समस्या होती. त्यासाठी ही मुलगी या बाबाकडे उपचाराच्या उद्देशाने येत होती. मात्र, हा बाबा तिचा गैरफायदा घेत असल्याचे व्हिडिओवरून पूढे येत असल्याचे दिसते आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.)