भारतातील नवरी असो किंवा परदेशातील नवरी ती जर दुस-या महिलेसोबत तिच्या पतीला पाहलं तर ती भडकणारच. नव-यानं दिलेला धोका जगातील कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात बायकोनं तिच्या नव-याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगहात पकडलं. आणि त्यानंतर तिनं जो काही प्रकार केला तो बघून तुम्ही सर्वच थक्क व्हाल. महिला नव-याचा पाठलाग करताना चक्क सुपरमॅन बनली.

बायकोनं नव-याला एका महिलेसोबत कारमध्ये जाताना पाहिलं. बायको दिसताच नव-यानं तिथून सटकायचा प्रयत्न केला, मात्र बायकोनं कसलीही पर्वा न करता ती थेट नव-याच्या गाडीच्या बोनेटवर जाऊन बसली. ती नव-याला गाडी थांबवण्याची विनंती करत होती. मात्र नवरा आणखी वेगात गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होता.

बायको कारच्या बोनेटवर चढल्यानं नवरा घाबरला होता. त्यातच त्याच्या सोबत त्याची गर्लफ्रेंड ही होती. जर गाडी थांबवली तर बायको धुलाई करणार आणि भर रस्त्यात तमाशा करणार, त्यामुळे नवरा काही गाडी थांबवायला तयार नव्हता. यावेळी जर त्याची बायको खाली पडली तर तिला मार लागू शकतो हे देखील तो विसरला होता. तर बायको बोनेटवर बसून मोठ मोठ्यानं ओरडत होती.

(गर्लफ्रेंड बेडरूममध्ये सापडली दुस-या मुलासोबत, बॉयफ्रेंडनं सेल्फी काढून फोटो केले व्हायरल)

बायकोचा आरडाओरड बघून काही लोकांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर नव-यानं गाडी थांबवली. गाडी थांबताच बायको रागानं लाल झाली आणि तिनं थेट नव-याचीही धुलाई करण्यास सुरूवात केली. तसंच गर्लफ्रेंडवरही तिनं हल्ला चढवला. मात्र मध्येच नव-यानं येऊन त्याच्या गर्लफ्रेंडला वाचवलं. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीनं मोबाईलवर शुट केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली. त्यानंतर हा व्हिडीयो चांगलाच गाजला.

व्हिडीयो पाण्यासाठी खाली क्लिक करा…