आज सकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मराठी भाषेचा मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना किती त्रास होऊ शकते याचा अंदाज येतो. या व्हिडिओत एक मुलगा भरपूर रडत आहे. या मुलाला त्रास कसला आहे तर मराठीत असलेल्या ऱ्हस्व, दिर्घ, आकार, उकार, वेलांटी या सगळ्या व्याकरणाची. या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकायचं आहे. कारण तिथे व्याकरणाचा त्रास नाही असं त्याला वाटतं. पाहा काय आहे हा प्रकार व्हिडिओतून….

या व्हिडिओत एक मुलगा आपल्या मराठी माध्यमातील शिक्षणाला कंटाळला आहे. आणि त्याला असं वाटतं की इंग्रजी माध्यमात शिक्षण केलं तर हा त्रास नसेल. त्यामुळे तो आपल्या पालकांना सांगतोय की, मला मराठी माध्यमात नाही शिकायचं. मी इंग्रजीमध्ये शिकेन कारण मला हे व्याकरण त्रास देतं.

आतापर्यंत आपण पाहिलं होतं की इंग्रजी माध्यमात मुलांना त्रास होतो. किंवा त्यांच्यावर शिकण्यासाठी जबरदस्ती केली जाते. मात्र आता हाच प्रकार आपण मराठीत देखील पाहत आहोत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांप्रमाणेच पालक देखील संभ्रमात आले आहेत की नेमकं त्यांनी काय करायला हवं.