ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान क्रॅश झाल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विमानात ७२ प्रवासी आहेत. हे विमान कोलंबियात दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानातील प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एएफपी या वृत्तेसंस्थेनुसार विमानात ब्राझीलच्या स्थानिक फुटबॉल क्लबमधील खेळाडू होते. हे विमान बोलिवियावरुन मॅडलिन विमानतळाकडे जात होतं. त्यावेळी कोलंबियात या विमानाला अपघात झाला.

तेथील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील फुटबॉल खेळाडू प्रवासी हे बुधवारी कोपा सुदामेरिकामध्ये फायनलला सहभागी होणार होते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मध्यरात्री झालेला आहे. तसेच सर्व मदत कार्य तेथे पोहोचलेले आहेत. मात्र किती जीवितहानी झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या अपघाताची एवढी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. पुढील माहिती लवकरच अपटेड केली जाईल…