वॉशिग्टन: अमेरिका संसदेच्या जवळपास 30 महिला  सदस्यांनी (खासदार) स्लीवलेस कपडे (बिना बाह्यांचे) घालून आंदोलन केले. हे आंदोलन महिलांना स्लीव लेस कपडे वापरण्याच्या अधिकार आणि हक्कांसाठी होते. आंदोलनकर्त्या महिला खासदारांनी संसद अध्यक्षांच्या लॉबीसमोर शुक्रवारी हे प्रदर्शन केले. इथे पुरूषांनी जॅकेट आणि महिलांनी पूर्ण बाह्यांचे कपडे घालून येणेच बंधनकारक आहे. त्याविरोधात आवाज उठवत महिला सदस्यांनी आंदोलन केले.

सीएनएनने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, महिला खासदार आणि प्रसारमाध्यमांचे प्रथिनीधींनीसुद्धा येथे जॅकेट किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे घालून येणे बंधनकारक आहे. दरम्यान, येथील कॉंग्रेस सदस्या चिली पिन्ग्री chellie pingree)  यांनी ट्विट केले आहे की, ‘हे 2017 साल सुरू आहे. महिलांना मतदानाचा अधिकारा आहे. त्या अनेक कार्यालयांमध्ये प्रमुखही आहेतच. त्या आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगू शकत आहेत. त्यामुळे सभागृह आणि आवारातही पूर्ण बाह्यांचा हा नियम बदलण्याची वेळ आता आली आहे.’

कॅलिफोर्नियातही डेमॉक्रेटिक पार्टीच्या खासदार लिंडा सांचेज यांनी काही वर्षांपूर्वी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याच्या कारणावरून तीव्र प्रतिक्रीया देत, ‘हे नियम अगदीच पूरातन काळातले आहेत. आम्ही जर परंपराच पाळत बसलो असतो तर, या फ्लोअरवर शौचालयही पहायला मिळाले नसते’, असे म्हटेल आहे.

दरम्यान, सीबीएस न्यूजने आपल्या वृत्तात बिन बाह्यांचा ड्रेस घातल्यामुळे आपल्या महिला प्रतिनीधीला सदर सभागृहात जाण्याबाबत मज्जाव करण्यात आल्याचे वृत्त दिले होते. हे प्रकरण मिटते न मिटते तोच पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, रिपलब्लिकन खासदार मार्था मैकसेली यांनी बुधवारी म्हटले होते की, मी सभागृहातून परत जाऊ इच्छिते कारण की, मी बिनाबाह्यांचे कपडे घातले आहेत. तसेच, माझे शूजही पूढून उघडे आहेत. तेव्हा अध्यक्ष मोहदय मी परतच जाऊ इच्छिते. मार्थाच्या या टीप्पणीनंतरच महिला खासदारांनी हे नवे आंदोलन सुरु केले.