2018 मध्ये भारतातील टू व्हीलर उत्पादक बजाज ऑटो आणि ऑस्ट्रिया बेस केटीएम कंपनीने एक महत्वाची बातमी जाहिर केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की हुस्कावरना मोटारसायकल 2018 मध्ये जगभरात लाँच करणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी 3 जुलै सोमवारी केली आहे.

स्टीफन पेरिअर जे केटीएमचे सीईओ आहेत आणि राजीव बजाज जे बजाज कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर यांनी असे ठरविले आहे की हुस्कवरना मोटरसायकल जगभरात लाँच करून आपला बिझनेस अधिक पटीने वाढवायचा आहे. 2018 च्या सुरूवातीला याचे पहिले मॉडेल बाजारात येईल. ज्यामध्ये Vitpilen 401, Svartplien 401 आणि Vitpilen 701 यांची निर्मिती ऑस्ट्रियाच्या मट्टीग्फोन मध्ये बनविण्यात येणार आहे. बजाज ऑटोचं असं निश्चय आहे की हुस्कवरना मोटरसायकल ही KTM च्या प्रोडक्टसप्रमाणे भारतात आणि इंडोनेशियामध्ये आणावी.

Ravi Bajaj

हे या दोन्ही मोठ्या कंपन्यांचे जॉईन प्रोडक्ट्स असणार आहेत. तसेच त्यांच्या माहितीनुसार 1 लाख युनिट्, 2017 मध्ये तयार केले होते. आता या कंपनीसा मानस हे प्रोडक्ट्स डबल करण्याचा आहे. यंदा 2 लाख प्रोडक्टस ही कंपनी तयार करणार आहे. त्याचप्रमाणे 2018 मध्ये या दोन्ही कंपनी आपल्या पार्टनरशिपचे 10 वे वर्ष साजरे करत आहेत.

DUKE 125-390 आणि आरसी 125 – 390 हे बजाजचे ऑटो प्रोडक्टसन फॅसिलिटी चाकन आणि भारतात आहे. आणि आता हे पार्टनर ग्लोबल याला लाँच करून स्वतः ग्लोबल होत आहेत.