नवी दिल्ली – तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज ऑटोने आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन रिलॉन्च केल्या आहेत. बजाजने प्लॅटिना ES स्पोक आणि CT 100 ES अलॉय या दोन बाईक्स पून्हा लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स आता नव्या रुपात आल्या आहेत आणि यामध्ये अनेक नवे फीचर्सही आहेत. जाणून घेऊयात या नव्या बाईक्समध्ये काय आहेत नवे फीचर्स…

bajaj_ct100_front_view_640x480

बजाज CT 100

बजाजची CT 100 ही बजेटमधील बाईक आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट आणि अलॉय व्हिक असलेल्या या बाईकची एक्स शो रूममधील किंमत 41,997 रुपये आहे. या गाडीचा लूक एकदम सिंपल आहे. मात्र, परफॉरमंस आणि मायलेज या गाडीची खास बाब आहे. या गाडीचा मायलेज अधिक आहे तर कमी किंमत हे या गाडीचे दोन प्लस पॉईंट आहेत. पॉवरसाठी यामध्ये 100cc चं इंजिन लावण्यात आलेलं आहे जे 8.2ps ची पॉवर आणि 8.05nm चं टार्क देतं. (हे पण पाहा: बजाज ऑटो आणि केटीएम 2018 मध्ये हुस्कवरना मोटारसायकल ग्लोबल करणार)

Bajaj-Platina-100-ES-2

बजाज प्लॅटीना

बजाज प्लॅटीना ES अलॉय व्हीक या गाडीची दिल्लीतील एक्स शो रूममधील किंमत 42,650 रुपये इतकी आहे. या गाडीत वेळोवेळी नवनवे बदल पहायला मिळत आहेत आणि ही गाडी खुपच चांगलं प्रदर्शन करत आहे. या गाडीची सीटला स्प्रिंग टाइपमध्ये बनविण्यात आलं आहे. तसेच फ्रंट सस्पेंशन 28% लांब केलं आहे तर रियर स्प्रिंग सस्पेंशन आता 22% एक्स्ट्रा आहे. ज्यामुळे ही बाईक खराब रस्त्यांवरही स्मुथ चालते आणि राइडची मजा बाईक रायडरला घेता येते. या बाईकमध्ये 102cc चं इंजिन, 8.2 ps पॉवर, 8.6 nm टार्क आणि 4 स्पीड गेअरच्या मदतीने बाईक चांगला परफॉरमन्स देते.