नवी दिल्ली: जर्मनीची लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ची 7th-जेनरेशन 5 सीरीज भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या कार्सना गेल्यावर्षी इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरवण्यात आलं होतं. आता याच्या तीन व्हेरिएंट कार्स भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत. या कार्समध्ये आयड्राईव्ह सिस्टीम आणि वायरलेस चार्जिंगसारख्या अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत. या कार्सची प्री-बुकींग आधीच सुरू झाली होती.

बीएमडन्ल्यू 5 सीरीजमध्ये तीन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात एक पेट्रोल आणि दोन डिझेलसाठी आहेत. या कारचे कंपनीने चार व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यात 520d स्पोर्टलाईन, 520d लक्झरीलाईन, 530d एम स्पोर्ट्स, 530i स्पोर्ट्सलाईन या कारचा समावेश आहे.

चारही कार व्हेरिएंटच्या किंमती :

520d SportLine – 49.9L
520d LuxuryLine – 53.60L
530d MSport – 61.30L
530i SportLine – 49.90L

7th जेनरेशन 5 सीरीज 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. एन्ट्री लेव्हल मॉडेल्मध्ये 520d टॅग असेल. ही कार 2.0 लीटर, 4 सीलेंडर इंजिनसोबत येणार आहे. या कारचं इंजिन 190PS/400Nm पावर जनरेट करतं.

दुसरं व्हेरिएंट 530i हे आहे. ज्यात 2.0 लीटर, 4 सीलेंडर पेट्रोल इंजिन आहे. ही 252PS/350Nm ची पावर जनरेट करतं. हेच इंजिन बीएमडब्लू 330i GT मध्ये लावण्यात आलं आहे.

7th जेनरेशन 5 सीरीज टॉप व्हेरिएंट 530d मध्ये 3.0 लीटर, 6 सीलेंटर डिझल इंजिन देण्यात आलं आहे. हे 265PS/620Nm पावर निर्माण करतं. सर्वच व्हेरिएंट 8 स्पीड ऑटेमॅटिक गिअरबॉक्सवर चालतील.