जीप कम्पास या गाडीला ऑगस्ट 2017 मध्ये भारतात लाँच केलं जाणार आहे. कंपनीने या नव्या एसयूवीसाठी बुकिंगला देखील सुरूवात केली आहे. आता माहिती अशी आहे की, आतापर्यंत तब्बल 1000 गाड्यांच बुकिंग झालं आहे. आणि आताच जीप कम्पासचं ब्रोशर देखील लिक झालं आहे. ज्यामध्ये याबाबत अधिक माहिती दिली असून ग्राहकांना आकर्षित केलं जातंय.

जीप कम्पासला देखील जीप रेनेगेडच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. दिसण्यात ही एसयूवी ग्रँड चेरोकीमुळे प्रेरित झाली आहे. यामध्ये अमेरिकन एसयूवी लांबी 4447एमएम, रूंदी 1818 एमएम आणि उंची 1651 एमएम इतकी आहे. तर व्हीलबेस 2643 एमएम आणि क्लियरेंस 178 एमएम आहे.

जीप कम्पास पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन ऑप्शनसोबत असणार आहे. या एसयूवीमध्ये 1.4 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन लावलं आहे. तर यामध्ये 138 बीएचपीची पावर असणार आहे. तसेच यामध्ये 2 लीटर डिझेल इंजिन 170 बीएचपी पावर असणार आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड DDCT डुअल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन हा ऑप्शन दिलं आहे. जीप कम्पासमध्ये 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री, स्टार्ट/स्टॉप बटन, एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, 6-एयरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट स्टार्ट, रियर कॅमेरा इत्यादि फीचर्स देण्यात आलेत.
जीप कम्पासची किंमच ही 20 लाख रुपये ते 25 लाख रुपये असणार आहे.