मुंबई: 1 जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळणार आहेत. याचा प्रभाव वाहनांवरही पडणार आहे. अनेक कार्स स्वस्त होणार आहे तर मारूतिच्या दोन कार्स महाग होणार आहेत. मारूति सुझुकीच्या सियाज आणि एमपीवी अर्टिगा या कारवर जीएसटीचा वाईट प्रभाव होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कार्स साधारण 50 हजारांनी महाग होणार आहेत.

मारूति सुझुकीच्या या दोन्ही सियाज आणि अर्टिगा या कार्सची विक्री चांगली आहे. प्रत्येक महिन्यात सियाजचे साधारण 5 हजार युनिट विकले जात आहे. तेच अर्टिगानेही चांगलं मार्केट पकडलं आहे. जीएसटी हायब्रिड कारवर कोणतीही सूट देत नाहीये. त्यामुळेच या दोन्ही कारच्या किंमती वाढणार आहेत. या कार्सची किंमत किती असेल हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी मीडिया रिपोर्टनुसार, यात 1.5 लाखांची वाढ होऊ शकते. (हे पण वाचा: जीप कम्पासला आतापर्यंत मिळाली 1000 बुकिंग, ऑगस्टमध्ये होणार भारतात लाँच)

या दोन्ही कार्समध्ये ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कि-लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन सारखे मॉडर्न फिचर्स दिले गेले आहेत. त्यासोबतच या दोन्ही कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इएसपी आणि ISOFIX चाईल्ड सेफ्टी माऊंट सारखे सेफ्टी फिचर्सही दिले आहेत.

या दोन्ही कारमध्ये लावण्यात आलेलं 1.4 लीटर K-Series पेट्रोल इंजिन 91 बीएचपी पावर आणि 135Nm चं टार्क निर्माण करतं. कारच्या डिझल इंजिनला SHVS माईल्ड-हायब्रिड सिस्टम देण्यात आलं आहे. या कारच्या पेट्रोल इंजिन व्हर्जनवर जीएसटीचा काहीही प्रभाव पडणार नाही.