लक्झरी कार सेगमेंटमध्ये आता एक नवी कोरी कार अॅड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मर्सिडीज एएमजी जीएलसीचे दोन वेरिंएट 220 डी 4 मॅटिक आणि 300 4 मॅटिक ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आता कंपनी याचं तिसरं वेरिएंट 43-4 मॅटिक कूपे लाँच करणार आहे.

भारतात आज म्हणजे 21 जुलै रोजी ही कार लाँच झाली आहे. आता उपलब्ध असलेल्या वेरिएंची किंमत 53 लाख ते 55 लाख रुपयापर्यंत ही शोरूममध्ये मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे आता अशी संभावना आहे की 43 4 मॅटिक कूपे 80 लाख रुपयांत उपलब्ध होईल. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 43 4 मॅटिक कूपे, जीएलसी रेंजमध्ये सर्वात पॉवरफुल वेरिएंट असल्याची दाट शक्यता आहे.

यामध्ये 3 लीटरचं ट्विन टर्बो वी 6 पेट्रोल इंजिन देखील मिळणार आहे. जे 367 पीएस पावर आणि 520 एनएम का टार्ग देण्यात येणार आहे. तसेच हे इंजिन 9 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत जोडले गेले आहे. याद्वारे पावर सप्लाय करण्यात आलं आहे. तसेच टॉक स्पीड 250 किमी प्रति तास देण्यात येणार आहे. 100 चा स्पीड असलेल्या 4.9 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. जीएलसी 43 ४ मॅटिक कूपेमध्ये ईको, कंफर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट प्लस आणि इंडिविजुअल ड्रायव्हिंद मोड देण्यात आले आहे.