नवी दिल्ली: मर्सिडीज बेंजच्या कलेक्शनमधील सर्वात छोटी SUV मानली जाणारी अपडेटेड जीएलए कार भारतात लॉन्च करण्यात आलीये. या कारच्या पेट्रोल मॉडेलची किंमत ३२.३० लाख रूपये इतकी आहे. तर डिझेलमध्ये या कारचे तीन मॉडेल आहेत. त्यातील GLA 200d Style ची किंमत 30.65 लाख, GLA 200d Sport कारची किंमत 33.85 लाख तर GLA 220d 4MATIC कारची किंमत 36.75 लाख इतकी आहे. आधी या SUV ची किंमत 33.1 ते 36.2 लाख रूपये दरम्यान होती.

2017-Mercedes-Benz-GLA-18

2017-Mercedes-Benz-GLA-17

‘बेबी बेंज’मध्ये नवीन फ्रन्ट, रिअर बंपर देण्यात आलं आहे, जे या कारला SUV सारखा लूक देतं. ऑल एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प सेटअप, 18 इंच अलॉय व्हिल्ससारखे फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत. सोबतच यावेळी या कारला 481 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे.

2017-Mercedes-Benz-GLA-19

2017 Mercedes-Benz GLA facelift  interior

2017 Mercedes-Benz GLA facelift interior

जीएलएमध्ये 2.0 लीटर पेट्रोल, 2.1 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जीएलए 200 आणि जीएलए 200 डी 184 पीएस/300 एनएम आणि पीस/300 एनएमची पावर देतं. तेच याचं फोर व्हिल ड्राईव्ह व्हर्जन 170 पीएसची पावर आणि 350 एनएमचा टार्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 7 स्पीड ड्यूल क्लच गिअरबॉक्सला कनेक्ट आहेत. या कारची स्पर्धा नुकतीच अपडेट होऊन आलेल्या Audi Q3 आणि BMW X1 या कार्ससोबत आहे.