GST लागू झाल्यावर अनेक कंपन्यांनी आपल्या प्रोडक्टच्या किंमतींमध्ये कपात केली. तर काही प्रोडक्टवर वाढ देखील झाली होती. कार बनवणारी कंपनी Renault आपल्या कारच्या किंमतींमध्ये 7% कपात केली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, आम्ही ग्राहकांना जीएसटीचा अधिक फायदा व्हावा यासाठी हे केलं आहे.

या Renault च्या कारमध्ये 5,200 पासून ते अगदी 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे. क्विड क्लाइंबरच्या किंमतीमध्ये चक्क 30 हजार रुपयांपर्यंत कमी केलं आहे. डस्टरच्या किंमतीत 1 लाखापर्यंत सूट असून लॉजी स्टेपवेमध्ये 46 हजार किंमत कमी केली आहे. रेनोने सांगितले आहे की जीएसटी आताच्या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आता कितीही कठिण वाटत असलं तरीही याचा फायदा नागरिकांना आगामी काळात नक्की होईन. (हे पण वाचा – जीएसटी लागू होण्याअगोदर रॉयल एनफील्डने किंमत केली कमी)  

कुठल्या कारमध्ये किती कपात?

  • क्वीड क्लायम्बर एएमटी – 5,200 ते 29,500 रु.
  • एसयूव्ही डस्टर RXZ AWD – 30,400 ते 1,04,700 रु.
  • लॉजी स्टेपवे RXZ – 25,700 ते 88.600 रु.

जीएसटी करप्रणालीचा फायदा ग्राहकांना देण्याचं आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचलक सुमन सावनी यांनी सांगतले. दरम्यान, कालच टाटा मोटर्स आणि होंडा या दोन कंपन्यांनी जीएसटीचा फायदा आपापल्या ग्राहकांना देण्याचं ठरवत किंमती स्वस्त केल्या. त्यानंतर आता रेनॉल्ट कंपनीनेही गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहेत.