नवी दिल्ली: प्रसिद्ध कार कंपनी स्कोडाने आपली नवीन फेसलिफ्ट सेडान कार ऑक्टाविया भारतात लॉन्च केली आहे. भारतात या कारची एक्स शो रूम किंमत 15.49 लाख रूपयांपासून ते 22.89 लाख रूपयांदरम्यान असणार आहे. या कारच्या इंजिनबाबत सांगायचं तर नव्या फेसलिफ्ट ऑक्टाविया दोन पेट्रोल आणि एक डिझल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. चला नजर टाकूया या कारच्या फिचर्सवर…

स्कोडा ने ऑक्टावियाला एक नवीन रिफ्रेशिंग लूक दिला आहे. याच्या फ्रन्ट लूकबद्दल सांगायचं तर हेडलॅम्प, फॉग लॅम्प, नवीन बंपर आणि ग्रिल दिले आहेत. कारला स्पोर्टी लूक देण्यासाठी यात 16 इंचाचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत. या कारच्या डिझाईनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलंय. त्यासोबतच 8.0 इंचाच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आलंय. हे सिस्टम अ‍ॅपल कारप्ले, अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो आणि मिररलिंक कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतं. या कारमध्ये कंपनीने ऑटोमॅटिक पार्किंग मोड सेवा दिली आहे.

2017 Skoda Octavia

  • पेट्रोल ऑक्टाविया इंजिन डिटेल्स:

1.8 लीटर टीएसआय इंजिन
पावर 180 पीएस
7 स्पीड डिएसजी गिअरबॉक्स

  • पेट्रोल ऑक्टाविया इंजिन डिटेल्स 2:

1.4 लीटर पेट्रोल इंजिन
150 पीएस पावर
6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स

  • डिझेल ऑक्टाविया इंजिन डिटेल्स:

2.0 लीटर डिझल इंजिन
143 पीएसची पावर
6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

42a27b83-cc6e-4c0e-b5fd-6a4091702af9-1024x480

नवीन स्कोडा ऑक्टाविया या शानदार कारची स्पर्धा ह्यूंदई एलांट्रा आणि टोयोटा कोरोला एल्टिस या कारसोबत असेल.