जीएसटी लागू व्हायला अगदी काहीच दिवस राहिले आहेत. अशातच ऑटोमोबिल मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. जीएसटी लागू होण्याअगोदर देशातील लोकप्रिय टू-व्हीलर कंपनी रॉयल एनफील्डने क्लासिक 350, बुलेट 350 आणि थंडरबर्ड 350 च्या किंमती कमी केल्या आहेत. तुम्हाला सांगायच झालं तर जीएसटी 350 CC आणि यापेक्षा कमी कॅपेसिटी असलेल्या बाइकच्या दरात कपात झाली आहे.

याआधी बजाज ऑटोने आपल्या मॉडल्‍सच्या किंमतीत ४,५०० रुपयांची घट केली आहे. रॉयल एनफी‍ल्‍डचे प्रेसि‍डेंट रुद्रतेज सिंह यांनी म्हटलं की, आमचं असं म्हणणं आहे की, जीएसटीमुळे भारतात बिझनेस बदलेल. यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. रॉयल एनफी‍ल्‍ड जीएसटीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना देणार आहे. १६ जून २०१७ पासून खरेदीवर ऑन रोड किंमत बदलली आहे.

बुलेट 350 ची किंमत 1.13 लाख रुपये आहे. ऑन रोड किंमतीवर ३ ते ४  हजरांची घट केली आहे. ही किंमत ट्वीन स्पार्क आणि इलेक्ट्रा या दोनही मॉडलवर लागू होणार आहे. तर क्लासिक 350 ची किंमत 1.35 लाख रुपये आहे त्याच्या किंमतीतही 3 ते 4 हजारांची सूट दिली आहे. थंडरब्रिड ३५० ची किंमत १.६१ लाख रुपये आहे. त्याच्या किंमतीत ७००० हजारांची सूट दिली आहे.