Aapdi Thaapdi Teaser: श्रेयश तळपदेने वाढदिवशी शेअर केला 'आपडी थापडी'चा टीझर, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
श्रेयसने 27 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याने सोशल मीडियावर आगामी 'आपडी थापडी' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Aapdi Thaapdi Teaser: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने तुफान कमाई करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पुष्पा हा चित्रपट हिंदी (hindi), तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. हिंदी भाषेतील चित्रपटात अल्लू आर्जूनच्या भूमिकेला अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) आवाज दिला आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान आता श्रेयसने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser) त्याने इंस्टाग्रामवर (शेअर केला आहे.
Also Read:
- Celebrity Ganpati Bappa: मराठी सेलिब्रिटींच्या घरात बाप्पांच गाजत वाजत स्वागत, पाहा सेलिब्रिटी बाप्पांचे फोटोज
- Ganesh Chaturthi 2022 : 'या' मराठी कलाकारांच्या घरी झाले गणपती बाप्पांचे आगमन, पाहा मनमोहक फोटोज!
- Shreyas Talpadeने 'श्रीवल्ली' गाण्यावर Allu Arjun स्टाईलने केला जबरदस्त डान्स, एकदा व्हिडिओ बघाच!
वाढदिवसाच्या दिवशी शेअर केला टीझर
श्रेयसने 27 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याने सोशल मीडियावर (social media) आगामी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत (mukta barve) स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपाटात संदीप पाठक (sandip pathak), नंदू माधव (nandu madhav), खुशी हजारे (khushi hajare), नवीन प्रभाकर (navin prabhakar) ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.
View this post on Instagram
उत्सुकता वाढवणारा टीझर
एक मिनिटाच्या या टीझरमध्ये कोणाचाही चेहरा ना दाखवता मुलगी, बाबा आणि आई यांच्यात सुरु असलेला संवाद दाखवण्यात आला आहे. श्रेयसने ‘आपडी थापडी’ चा टीझर शेअर करत चित्रीकरणास सुरुवात झाल्याची माहिती दिली. ‘आजच्या दिवशी आपणासर्वांसाठी एक खास भेट. माझ्या बरोबरच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या बाळालाही लाभो… हीच बाप्पा चरणी प्रार्थना’ असे कॅप्शन त्याने टीझर शेअर करतांना दिले आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या