Top Recommended Stories

Abhishek Bachchan Birthday: अभिषेक बच्चन लक्झरीयस कारचा चाहता, संपत्ती ऐकून तर तुम्ही चकीतच व्हाल!

Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Bollywood Superstar Amitabh Bachchan) यांचे सुपुत्र आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan Birthday) याचा आज (5 फेब्रुवारी) वाढदिवस.

Published: February 5, 2022 3:00 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Abhishek Bachchan Birthday: अभिषेक बच्चन लक्झरीयस कारचा चाहता, संपत्ती ऐकून तर तुम्ही चकीतच व्हाल!

Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Bollywood Superstar Amitabh Bachchan) यांचे सुपुत्र आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan Birthday) याचा आज (5 फेब्रुवारी) वाढदिवस. अभिषेककडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. याचसोबत तो महागड्या कारचा देखील दिवाना आहे. त्याच्याकडे लक्झरीयस कारचे (Luxurious Car)आहे.

Also Read:

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेककडे सुमारे 203 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो महिन्याकाठी 2 कोटी रुपये कमवतो. त्यानुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न 24 कोटी इतके आहे. चित्रपट आणि जाहिरात हेच त्याचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. गेल्या 20 वर्षांपासून अभिषेक मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने ‘रिफ्युजी’ ( Refugee) या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र, या प्रवासात त्याच्या वाट्याला मोजकेच चित्रपट आले, तरी देखील तो समाधानी आहे.

You may like to read

अभिषेक महागड्या कारचा चाहता…

अभिनेता अभिषेक बच्चन हा महागड्या कारचा मोठा चाहता आहे. त्याच्या गॅरेजमध्ये एक से बढकर एक लक्झरी कार आहेत. यात ऑडी A8 L (Audi A8 L), मर्सिडीज बेन्ज SL350D (Mercedes Benz SL350D), मर्सिडीज बेन्ज AMG (Mercedes Benz AMG), बेंटले कॉन्टिनेंटल GT (Bentley continental gt) आदी आलिशान कारचा समावेश आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, अभिषेक बच्चन हा अधून मधून पार्श्वगायन देखील करतो.

पत्नी ऐश्वर्या वयाने 2 वर्षे मोठी…

मायानगरी म्हणजे मुंबईत जन्मलेला अभिषेकचे प्राथमिक शिक्षण जमनाबाई स्कूल आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मॉडर्न स्कूल वसंत विहार, नवी दिल्ली आणि स्विर्त्झलंड येथील एग्लोन कॉलेजमध्ये अभिषेक पदवीचे शिक्षण घेतले. अभिषेक याने ‘रिफ्युजी’ या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसी कमाल दाखवू शकला नाही. मात्र, तरी देखील अभिषेकच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ( Actress Aishwarya rai) 20 एप्रिल 2007 रोजी विवाह बंधनात अडकले. ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये दोन वर्षांचे अंतर आहे. ऐश्वर्या ही अभिषेक पेक्षा 2 वर्षे मोठी आहे. लग्नाच्या वेळा ऐश्वर्या 33 वर्षांची तर अभिषेक 31 वर्षांचा होता. या दाम्पत्याला एक कन्या असून तिचे नाव आराध्या आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 3:00 AM IST