मुंबई : टीव्ही जगतातील (TV Industry) प्रसिद्ध अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सध्या चर्चेमध्ये आहेत. त्या सध्या चर्चेमध्ये असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा नवा लूक. स्मृती इराणी यांचा नवा लूक (New Look) पाहून तुम्ही त्यांना ओळखू सुद्धा शकणार नाहीत. स्मृती इराणी यांनी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेंशन (Smriti Irani Body Transformation) केले आहे. त्यांच्यामध्ये झालेला हा बदल पाहून सर्वांना धक्का बसला आहे. योगा (Yoga) आणि एक्सरसाइज (Exercise) करुन त्यांनी आपलं खूप वजन कमी केलं आहे.Also Read - Viral Video : धक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

स्मृती इराणी सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असतात. त्या सोशल मीडियावर नेहमी आपले फोटो (Photo) पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी नव्या लूकचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) पोस्ट केला. हा फोटो पाहून सर्वांना धक्का बसला. स्मृती इराणी या खूपच बारीक झाल्या आहेत. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. टीव्ही क्वीन एकता कपूरने (TV Queen Ekata Kapoor) स्मृती इराणी यांच्या फोटोवर कमेंट्स करत ‘thinnnnnn’ असं लिहिलं आहे. Also Read - Karishma Kapoor Birthday : नवऱ्यापासून वेगळी होऊनही करिश्मा कपूर आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण!

Also Read - Viral Video : ट्रेनला लटकून स्टंट करणं पडलं महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर जखमी!

स्मृती इराणी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोंवर भरभरुन कमेंट्स करत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नव्या लूकचे कौतुक केलं आहे. अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलने (Manish Paul) स्मृती इराणी यांचा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘काय वेळ आली आहे. सर्व लोकं चहाच्या जागी काढा पिऊ लागले आहेत.’

स्मृती इराणीने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील स्मृती इराणी यांची भूमिका खूप गाजली होती. ही मालिका त्यावेळी इतकी सुपरहिट (Superhit) ठरली होती की प्रेक्षक आपली कामं सोडून ती पाहायचे. या मालिकेचं टायटल सॉन्ग ‘क्योंकी सास भी…’ त्यावेळी खूप हीट ठरले होते.