मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Bollywood actress Urvashi Rautela) वेगवेगल्या कारणाने नेहमी चर्चेत असते. विशेषत: तिच्या फिटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. मात्र, आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी (Urvashi Rautela) नुकताच विमानतळावर स्पॉट करण्यात आले, तेव्हा तिच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे उर्वशी चर्चेत आली आहे. तिच्या हातात असलेल्या बाटली ही ‘ब्लॅक वॉटर’ची (Black Water) होती. हे पाणी अतिशय महाग असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील ‘ब्लॅक वॉटर’ पाण्याचे सेवन करतो. उर्वशी आणि विराट यांच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी नियमीत ‘ब्लॅक वॉटर’चे सेवन करतात.Also Read - IPL 2022 MI vs RCB: सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाला अनुज रावतच्या खेळीचं ग्रहण, मुंबईचा सलग चौथा पराभव

‘ब्लॅक वॉटर’ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त (‘Black water’ is useful for health) असते त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, या पाण्याच्या एका बाटलीची किंमत (Black water price) ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या पाण्यासाठी प्रति लिटर 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात. ‘ब्लॅक वॉटर’ शरीरातील रोग प्रतिकार शक्ती (immunity) वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कोरोना काळात अनेक सेलिब्रिटीं या पाण्याचे सेवन करत आहेत. काही सेलिब्रिटी हे नियमीत या पाण्याचे सेवन करत असतात. हे पाणी फ्लूविक ट्रेसने इनफ्यूज केले जाते. या पाण्याचा रंग काळा असतो. या पाण्यात अनेक प्रकारचे मिनरल्स वापरले जातात, असे म्हटले जाते. Also Read - Virat-Anushka Photo: अनुष्का शर्माच्या किलर लूकने घेतली विराट कोहलीची विकेट, ट्वीट करून म्हणाला 'टू हॉट'

उर्वशी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आता उर्वशी रौतेलाचा (Urvashi in list of famous Bollywood actresses) समावेश आहे. उर्वशी केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही, तर फिटनेस, डान्स आणि ग्लॅमरस लूकमुळे (Glamorous look) नेहमीच चर्चेत असते. उर्वशी हेट स्टोरी 4, ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे, व्हर्जीन भानुप्रिया अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. उर्वशी लवकरच तामिळ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे बजेट 200 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. हा बिग बजेट चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Also Read - Virat Kohli Brand value: विराटच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कमालीची घट, 2 वर्षांत सुमारे 400 कोटींचं नुकसान