Adrushya Teaser Release: पुष्कर-रितेशच्या स्वॅगची चाहत्यांवर भूरळ, 'अदृश्य'चा धमाकेदार टीझर रिलीज
अदृश्य चित्रपट हा थ्रिलर असून यात प्रमुख भूमिकेत अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) , मंजिरी फडणीस (Manjari Fadnnis) आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहेत.

Adrushya Teaser Release: हिंदी चित्रपट ‘ताल’, ‘परदेस’, ‘कहो ना प्यार है’, ‘वेल कम बॅक’ यासारखे सुपटहिट चित्रपटांनंतर सिनेमॅटोग्राफर कबीर लाल (Kabir lal) यांनी आता दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. कबीर लाल यांचा दिग्दर्शित पहिला मराठी चित्रपट ‘अदृश्य’ ( Marathi movie Adrushya) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर (Adrushya Teaser Release) नुकताच रिलीज झाला आहे. येत्या 13 मे रोजी हा चित्रपट सिनेगृहात झळकणार आहे.
Also Read:
अदृश्य चित्रपट हा थ्रिलर असून यात प्रमुख भूमिकेत अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) , मंजिरी फडणीस (Manjari Fadnnis) आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहेत. विशेष म्हणजे पुष्कर-रितेशच्या स्वॅगची चाहत्यांवर भूरळ पाडणार आहे. या चित्रपटाचा, अर्थात ‘अदृश्य’ चा टीझर अभिनेता पुष्कर जोगने ‘कू’वर शेअर केला आहे.
मराठीसह बॉलिवुडमध्येही आपला आगळा ठसा उमटवलेला पुष्कर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सना चाहते कायमच उचलून धरतात.
अदृश्य 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यापूर्वी आलेल्या 45 सेकंदांच्या या टीझरमध्ये सिनेमा किती रोमांचक आणि वेगवान असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. पुष्कर जोगसह रितेश देशमुख आणि मंजिरी फडणीसचा स्टायलिश वावर यात आपण पाहू शकतात.
‘अदृश्य’ मध्ये प्रेक्षकांना थ्रिलरचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख, मंजरी फडणीस यांच्यासह पुष्कर मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांचे आहे. अजय कुमार सिंह आणि रेखा सिंह हे निर्माते आहेत. आपला आगळा ठसा उमटवलेल्या मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अनंत जोगही यात खास भूमिकांमध्ये बघायला मिळतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या