Lata Mangeshkar यांना उशीरा श्रद्धांजली वाहिल्याने ऐश्वर्या राय होतेय ट्रोल
ऐश्वर्या राय हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवंगत लतादीदींचा एक फोटो पोस्ट केला. 'माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. तुमच्या आत्म्याला शांती मिळो, असा मेसेज लतादीदींच्या फोटोखाली लिहिला होता. तरी देखील ऐश्वर्याला ट्रोल केले जात आहे.

Aishwarya Rai troll: स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश दु:खात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Mumbais Breach Candy Hospital) रविवारी सकाळी लतादीदींची प्राणज्योत (Lata Mangeshkar Passes Away) मालवली. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सेलिब्रेटी ते सामान्य व्यक्तीपर्यंत सोशल मीडियावर लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai troll) हिने लतादीदींना उशीरा श्रद्धाजली अर्पण केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.
Also Read:
माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत…
ऐश्वर्या राय हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवंगत लतादीदींचा एक फोटो पोस्ट केला. ‘माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. तुमच्या आत्म्याला शांती मिळो, असा मेसेज लतादीदींच्या फोटोखाली लिहिला होता. तरी देखील ऐश्वर्याला ट्रोल केले जात आहे. आता आठवण झाली का? असे म्हणत लतादीदींना उशीरा श्रद्धांजली वाहणाऱ्या ऐश्वर्याला नेटिझन्सनी सुनावले आहे. इतक्या उशीरा का पोस्ट केलीस, असा एकाने ऐश्वर्याला सवाल केला आहे.
शाहरुख खानच्या व्हायरल फोटोचे झाले कौतुक
गानसम्राज्ञी लता मंगेशकर याचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान देखील शिवाजी पार्कवर पोहोचला होता. शाहरुख खानचा लतादीदींना अखेरचा निरोप देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे पार्थिव ठेवलेले्या मंचावर अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पुजा ददलानी गेली होती. यावेळी शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना अखेरचा निरोप दिला तर त्याची मॅनेजर पूजा ददलानीने हात जोडून प्रार्थना करत लतादीदींना शेवटचा निरोप दिला. शाहरुख खानने दुवाँ मागितल्यानंतर हात जोडूनही नमस्कार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख प्रथम लतादीदींच्या पार्थिवावर फुलांचा हार अर्पण करतो. त्यानंतर लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या