मुंबई: आजकाल बॉलिवूड स्टार्सच्या डुप्लिकेट्सची जोरदार चर्चा आहे. दररोज फिल्म स्टार्सचे नवे-नवे डुप्लिकेट्स समोर येत आहेत. आता सौंदर्याची खाण समजली जाणारी दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ( Bollywood Actress Aishwarya Rai) सारखी दिसणारी आणखी एक तरुणी समोर आली आहे. (Aishwarya Rai Duplicate) तरुणीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणाऱ्या तरुणीला पाहून प्रत्येक जण थक्क होताना दिसत आहे.
Also Read - Kiara Advani ने ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये दिल्या सिजलिंग पोज!

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानी आमना इमरानचा फोटो व्हायरल झाला होता. आमना हिला ऐश्वर्याची डुप्लिकेट संबोधण्यात आलं होतं. आता इराणमध्ये देखील ऐश्वर्याची ‘फोटो कॉपी’ मिळली आली आहे. Also Read - पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि स्कर्टमध्ये Janhvi Kapoor चे हॉट फोटोशूट, फोटो पाहून चाहते फिदा!


महलाघा जबेरी (Mahlagha Jaberi) ही एक इराणी मॉडल आहे. नेटिजन्सचं म्हणणं आहे की, महलाघा ही हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसते. महलाघा ही 31 वर्षाची असून ती ऐश्वर्याची नवी डुप्लिकेट आहे. सध्या महलाघाचे फोटे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Also Read - Bhumi Pednekar झाली लालपरी, साडीमध्ये फोटोशूट करत दिल्या दिलखेच अदा!


ऐश्वर्याप्रमाणेच महलाघा जबेरीचे डोळे निळे आहेत. त्यामुळे तिची थेट ऐश्वर्याशी तुलना होत आहे. महलाघा ही ऐश्वर्यासारखी दिसत असती तरी दोघींमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे महलाघा ही ऐश्वर्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. महलाघाचे बोल्ड फोटो इंटरनेटचं तापमान वाढवण्याचं काम करतात, असं बोललं जातं. महलाघाचे सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिला 30 लाखाहून जास्त लोक फॉलो करतात.