By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Akshay Khanna Birthday Special : या कारणामुळे वयाच्या 47 व्या वर्षी अक्षय खन्ना आहे सिंगल, करिश्मा कपूरवर होते खूप प्रेम पण...!
Akshay Khanna Birthday Special : अक्षयने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या फिल्मी करिअरप्रमाणेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.

Akshay Khanna Birthday Special : बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते आणि दिवंगत राजकारणी विनोद खन्ना (Actor Vinod Khanna) यांचा मुलगा अर्थात अभिनेता अक्षय खन्नाचा आज वाढदिवस (Akshay Khanna Birthday) आहे. अक्षय खन्ना 28 मार्च रोजी म्हणजे आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाच्या (Himalay Putra Movie) माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या फिल्मी करिअरप्रमाणेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. तुम्हाला हे माहीत आहे का की वयाच्या 47 व्या वर्षीही अक्षय खन्ना हा सिंगल आहे. त्याने अद्याप लग्न केले नाही. अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील अविवाहित अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत (Actress Karishma Kapoor) त्याचे लग्न झाले होते हे फार कमी लोकांना माहीत असले. बॉलिवूडमध्ये अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आता अक्षय खन्नानेही ओटीटीवर (OTT) पदार्पण केले आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. आज अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत…
अक्षय खन्नाने ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील विनोद खन्ना यांनी केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पण त्यानंतर त्याला सर्वच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर तो ‘बॉर्डर’ आणि ताल या सुपरहिट चित्रपटात दिसला. या चित्रपटांमुळे तो रातोरात स्टार झाला. अक्षय खन्नाला ‘दिल चाहता है’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. कालांतराने अक्षय खन्नाची फॅन फॉलोइंगही वाढत गेली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अक्षय खन्नाच्या अभिनय करिअरचा आलेख उंचावर होता तेव्हा त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अक्षय खन्नाचे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्याशीही संबंध आल्याचे बोलले जाते. रणधीर कपूर यांची मुलगी करिश्मा कपूरने अक्षयसोबत लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, हे नाते तयार होण्यापूर्वीच तुटले कारण करिश्मा कपूरची आई बबिता यांचा या लग्नाला आक्षेप होता. अभिनेत्री करिश्मा कपूर ही त्यावेळी बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. तिची कारकीर्द यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करत होती. करिश्माने करिअरच्या या टप्प्यावर लग्न करून घरात बसावे असे बबिता यांना वाटत नव्हते. त्यामुळेच त्यांनी हे नाते नाकारले. रिपोर्टनुसार, जर बबिता यांनी हे नातं नाकारलं नसतं तर आज अक्षय खन्ना कपूर कुटुंबाचा जावई झाला असता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या