Top Recommended Stories

साऊथच्या ‘Soorarai Pottru’ चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच, Akshay Kumar दिसणार मुख्य भूमिकेत!

Akshay Kumar New Movie : बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं या चित्रपटासाठी घेतली जात होती. पण शेवटी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी अक्षय कुमारला मिळाली आहे...

Updated: January 30, 2022 9:30 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Akshay Kumar
'रक्षा बंधन' फर्स्ट पोस्टर जारी

Akshay Kumar New Movie : बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये (Akshay Kumar Movie) व्यग्र आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडच्या सर्वात जास्त ब्युझी असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्याचसोबत ते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय कुमारच्या चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वी खूप चर्चा होत असते. आता त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय (Akshay Kumar new Movie)काम करणार आहे.

Also Read:

तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ सूररई पोटरु’चा (Soorarai Pottru) हिंदी रिमेक येणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. अजय देवगण (Ajay Devgan), हृतिक रोशन (hritik Roshan), जॉन अब्राहम (John Abraham) आणि अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांचा या चित्रपटातील मुख्य भूमिका घेण्याचा विचार केला जात असल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. पण शेवटी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी अक्षय कुमारला मिळाली आहे. अक्षय कुमार या चित्रपटात दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

You may like to read

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सूररई पोटरु’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अक्षय कुमारची (Akshay Kumar) निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून अक्षय कुमारची या चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चा सुरु होती. अखेर अक्षयने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. ‘सुररई पोटरु’ या तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सुधा कोंगारा प्रसाद या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचेही दिग्दर्शन करणार आहेत. इमरान हाश्मीसोबतच्या त्याच्या नुकत्याच घोषित झालेल्या ‘सेल्फी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर अक्षय या चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुर्या दिग्दर्शित ‘सूररई पोटरु’ हा एअर डेक्कनचे संस्थापक जीआर गोपीनाथ (G R Gopinathan) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. जीआर गोपीनाथ हे एक असे पायलट होते ज्यांनी सर्वसामान्य माणसासाठी विमान प्रवास हा एक परवडणारा पर्याय बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. प्रेरणादायी बायोपिकने या उद्योगपतीच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या चित्रपटाला सिनेप्रेमींचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 9:29 AM IST

Updated Date: January 30, 2022 9:30 AM IST