Top Recommended Stories

'Bachchhan Paandey' फ्लॉप झाल्यामुळे Akshay Kumar दुखावला, म्हणाला - 'काश्मीर फाइल्सने माझा चित्रपट...'

Bachchhan Paandey Movie : आपला चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अक्षय कुमारला खूप दु:ख झाले आहे. त्याने 'द काश्मीर फाइल्स'मुळे माझा 'बच्चन पांडे' चित्रपट फ्लॉप झाला असल्याचे देखील बोलून दाखवले आहे.

Published: March 26, 2022 10:08 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

akshay kumar starrer bachchan paandey new song saare-bolo-bewafa song released holi per chalegi goli
bachchan paandey

Bachchhan Paandey Movie : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ चित्रपट (Bachchhan Paandey Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटला आला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) म्हणावी तितकी कमाल केली नाही. कारण सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची. प्रेक्षक देखील द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. बच्चन पांडे चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षक काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आपला चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अक्षय कुमारला खूप दु:ख झाले आहे. त्याने ‘द काश्मीर फाइल्स’मुळे माझा ‘बच्चन पांडे’ चित्रपट फ्लॉप झाला असल्याचे देखील बोलून दाखवले आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे बच्चन पांडे हा चित्रपट फ्लॉप झाल्याचा टोमणा मारला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, ‘लोकांना विवेक रंजन अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ इतका आवडला की माझा चित्रपट बुडाला.’ भोपाळ येथे आयोजित चित्र भारती चित्रपट महोत्सवात अक्षय कुमार बोलत होता. यावेळी या व्यासपीठावर ‘द काश्मीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री देखील उपस्थित होते.

You may like to read

भोपाळमध्ये माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘आपल्या सर्वांना देशातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. काही गोष्टी ओळखीच्या आहेत तर काही न ऐकलेल्या आहेत. विवेकजींनी द काश्मीर फाइल्स बनवून आपल्या देशाचे एक अत्यंत क्लेशदायक सत्य मांडले आहे. हा चित्रपट आम्हा सर्वांना हादरवून सोडणारी लाट म्हणून आला आहे. या चित्रपटामुळे माझा चित्रपट बुडाला ही दुसरी बाब आहे.’

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ झाल्यानंतरही लोकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह कमी होत नाहीये. या चित्रपटाने खर्चाच्या जवळपास 10 पट कमाई केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपटही प्रदर्शित झाला पण प्रेक्षकांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. काही ठिकाणी अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट पाहण्याऐवजी लोकांनी काश्मीर फाइल्स पाहण्याला पसंती दर्शवली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.