
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Alia Bhatt Pregnant: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने ती प्रेग्नन्ट असल्याचे जाहीर (Alia Bhatt Announces Pregnancy) केले आहे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नवविवाहित जोडपं लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं (Aliab- Ranbirs Baby) स्वागत करणार आहे. आलीयाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो (Alia Bhatt Pregnancy Posts) अपलोड करून आपल्या प्रेग्नंसीबाबत माहिती दिली आहे. हा फोटो (Alia Bhatt Pregnancy Picture) सोनोग्राफीचा असल्याचे दिसते. या फोटोला आलियाने “आमचं बाळ… लवकरच येत आहे” असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी ही गुड न्यूज दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी रणबीर आणि आलिया यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी छोटा लग्न समारंभ पार पडला होता. त्यानंतर आता ते दोघे आई-वडील होणार आहेत. रणबीर आणि आलिया त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी आलियाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर असताना रणबीरसोबत मॉनिटरकडे बघताना दिसत आहे. “आमचे बाळ….. लवकरच येत आहे,” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले.
ही बातमी कळताच आलिया आणि रणबीरचे इंडस्ट्रीतील मित्रांनी या जोडप्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रकुलप्रीतने “Oh my Congratulationssssss ️❤️” लिहिले, तर रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने प्रतिक्रिया देताना खूप हार्ट इमोजी आणि चुंबन पोस्ट केलेत. याशिवाय प्रियांका चोप्रा जोनास, मौनी रॉय, अमी पटेल, डायना पेंटी, गुनीत मोंगा आणि आलियाची आई सोनी राजदान यांनीही पोस्ट शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल रोजी त्यांच्या घरी जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि काही मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यानंतर लगेचच ती तिचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यासाठी बाहेर गेली तर रणबीर देखील त्याच्या पुढील चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. रणबीरने त्याच्या आगामी चित्रपट ‘शमशेरा’चे प्रमोशनही सुरू केले आहे. त्याचा दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्टही मुख्य भूमिकेत आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या