मुंबई: कोरोनाव्हायरसचा कहर सुरूच आहे. (Coronavirus Second Wave in India) त्यात मनोरंजन क्षेत्रात दु:खद बातम्यांची मालिका सुरूच आहे. ‘जिस देश में गंगा रहता है’, या चित्रपटात ‘सन्नाटा’ची (sannata) भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर (Veteran actor Kishor Nandalskar) यांचं दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. त्यात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas BhiKabhi Bahu Thi) फेम आणि टीव्ही अभिनेता अमन वर्मा (TV Actor Aman Verma) याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. अमन वर्मा यांना मातृशोक झाला आहे. याबाबत खुद्द अमन वर्मा यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अमन वर्मा यानं इन्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.Also Read - Sonam Kapoor ने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, क्युट फोटोंना मिळतेय पसंती!

अमन वर्माच्या आईनं 18 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्या 79 वर्षांच्या होत्या. अमन यानं आईचं छायाचित्र शेअर केलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मी तुम्हा सर्वांना अत्यंत दुःखानं सांगू इच्छितो की, माझी आई कैलाश वर्मा यांचं निधन झालं आहे. माझ्या आईनं या जगाला कायमचं अलविदा म्हटलं आहे. Also Read - कान्समध्ये Deepika Padukone ला पाहून या व्यक्तीचं सुटलं नियंत्रण, फोटो काढण्याच्या बहाण्याने केलं किस!

अमन वर्मानं पुढे लिहिलं की, ‘माझ्या आईला तुम्ही स्मरणात ठेवाल, अशी आशा करतो. कोरोनाकाळात लोक मला फोन करून विचारपूस करत आहेत. परमेश्वर सगळ्यांचं चांगलं करेल.’ अमन वर्माची भावनिक पोस्ट पाहून चाहते त्यांच्या आईला श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार अमन वर्मा यांच्या दु:खात सहभागी झाले आहेत. विंदू दारा सिंह, डेलनाज इराणी, जसवीर कौर, शिवानी गोसाई आणि श्वेता गुलाटीने अमन वर्माच्या पोस्टवर कमेंट केलं आहे. Also Read - जिममध्ये Disha Patani ची फ्री स्टाईल फायटिंग, छेड काढणाऱ्याला धू धू धुतले!

अमन वर्माची भावनिक पोस्ट…


दरम्यान, अमन शर्मा सध्या चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकत आहे. अमन वर्मा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘शांती’, आणि ‘कुमकुम’ सारख्या टीव्ही सीरिअल्समध्ये भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘बागबान’मध्ये अमन वर्मा दिसला होता. बागबानमध्ये अमन वर्मा यानं अमिताभ बच्चनच्या धाकट्या मुलाची भूमिका केली होती.