Top Recommended Stories

Ira khan ला आईच्या साडीत पाहून बॉयफ्रेंड Nupur Shikhare झाला रोमँटिक, पाहा फोटो...

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची कन्या इरा खान हिची कोझी पोझमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एरव्ही वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणारी इरा खान चक्क साडीत दिसते आहे

Updated: January 24, 2022 1:19 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Ira khan ला आईच्या साडीत पाहून बॉयफ्रेंड Nupur Shikhare झाला रोमँटिक, पाहा फोटो...

Ira khan In Cozy Pose: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) कन्या इरा खान (Ira Khan) हिची कोझी पोझमधील (Cozy Pose) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एरव्ही वेस्टर्न ड्रेसमध्ये (Western Dress) दिसणारी इरा खान चक्क साडीत दिसते आहे. इराला आईच्या साडीत पाहून बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) देखील रोमँटिक झाल्याचे दिसत आहे. खुद्द इराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘मला साडी नेसायला फार आवडतं…’ असे कॅप्शन देखील तिने फोटोखाली लिहिले आहे. सध्या तिचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Also Read:

‘बॉम्बेची खादी कॉटन साडी. हॅप्पी संडे. या साडीसाठी प्रीतम शिखरे यांचे खूप आभार.’, असे इराने म्हटले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील इराने तिच्या आईची साडी परिधान केली आहे. साडी संडे. आय लव्ह साडी. माझ्याकडे जास्त साड्या नाहीत. त्यामुळे आता अनेकांच्या अलमारीवर रेड मारणार आहे. ही आईची साडी आहे. कोलकात्याहून आणली आहे.

You may like to read

इराला साडी नेसायला खूप आवडते. काही दिवसांपूर्वी इराने एक पोस्ट केली होती. त्यात तिने म्हटले होते, की आठवड्याच्या प्रत्येक रविवारी ती काही वेळ साडी नेसेल. आता तर इराने नुपुर शिखरेची आईची साडी नेसली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. इराला आईच्या साडीत पाहून नुपूर रोमँटिक झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

कॅमऱ्यासमोर रोमँटिक झाली इरा..

फोटोमध्ये इरा ही बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) आणि त्याच्या आईसोबत दिसत आहे. इराने खादी कॉटनची साडी आणि रेड ब्लाउज परिधान केले आहे. एका फोटोमध्ये इरा (Ira Khan) ही बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झालेली दिसत आहे. इरा उभी असून नुपुरने तिला मागून प्रेमाने पकडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)


दरम्यान, नुपूर शिखरे ही आमिर खानचा फिटनेस कोच आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये इराने स्वतः च्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून इरा आणि नुपूर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 1:16 PM IST

Updated Date: January 24, 2022 1:19 PM IST