Top Recommended Stories

Arijit Singh Birthday Special: सलमान खानशी पंगा घेणं अरिजीत सिंगला पडलं होतं महागात, अंडरवर्ल्डने दिली होती धमकी!

Arijit Singh Birthday Special : अरिजीत सिंगने 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) या सिंगिंग टॅलेंट शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, अरिजीत सिंग या शोची ट्रॉफी जिंकू शकला नाही पण आज त्याचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांमध्ये (Bollywood singer) घेतले जाते. अरिजित सिंगची फॅन फॉलोइंग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.

Published: April 25, 2022 11:01 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Arijit Singh Birthday Special
Arijit Singh Birthday Special

Arijit Singh Birthday Special : बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या (Singer Arijit Singh) गोड आवाजाचे अनेक तरुण-तरुणी चाहते आहेत. अरिजित सिंगचा मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूड चित्रपटांसाठी (Bollywood Movie) अनेक सुपरहिट गाणी गाणारा अरिजित सिंग आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अरिजित सिंगचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील (West Bengal) जियागंज अझीमगंज शहरात झाला. अरिजीत सिंगने ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) या सिंगिंग टॅलेंट शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, अरिजीत सिंग या शोची ट्रॉफी जिंकू शकला नाही पण आज त्याचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांमध्ये घेतले जाते. अरिजित सिंगची फॅन फॉलोइंग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. आज अरिजित सिंगच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचितच माहीत नसतील…

अरिजितला मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी –

अरिजीत सिंगचे स्टारडम सर्वांनाच माहीत आहे. काहीवेळा त्याला यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. 2015 मध्ये अरिजीत सिंहने त्याच्या एका पोलिस तक्रारीत सांगितले होते की, त्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या येत होत्या. मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत सिंगरने सांगितले की, रवी पुजारी त्याच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागत आहे. पैसे न दिल्याने फुकटात दोन शो करण्यासाठी दबाव टाकत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींना टार्गेट करणे हे अंडरवर्ल्डचे जुने तंत्र आहे हे माहीत आहे.

You may like to read

सलमान खानसोबत पंगा –

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान अनेकदा अवॉर्ड शोमध्ये विनोद करताना दिसतो. शाहरुख खानसोबतचा त्याचा वाद सर्वांनाच परिचित आहे मात्र आता दोघांची मैत्री झाली आहे. सलमान खानचाही अरिजित सिंगशी फारसा संबंध नाही. एका अवॉर्ड शोदरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. गिल्ड अवॉर्ड शोमध्ये अरिजीतला हा पुरस्कार देण्यात आला पण तो स्टेजवर येताच सलमानने त्याच्या कपड्यांवर कमेंट केली. यामुळे संतापलेल्या अरिजीतने होस्ट सलमानलाही सांगितले की, ‘तुम्ही तर लोकांना झोपवले.’ यावर सलमान म्हणाला की, ‘तू असं गाणं गायलं की लोकांना झोप तर येईलच.’ तेव्हापासून सलमान आणि अरिजीत एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागले.

अरिजित सिंगचे केलेत दोन लग्न –

फार कमी लोकांना माहित असेल की अरिजीत सिंगचे पहिले लग्न यशस्वी झाले नव्हते. अरिजीतने त्याच्या सह-स्पर्धकासोबत पहिल्यांदा लग्न केले होते. मात्र, हे लग्न एक वर्षही टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर 2014 मध्ये अरिजीतने त्याची बालपणीची मैत्रीण कोएलसोबत लग्न केले. विशेष म्हणजे या दोघांचेही हे दुसरं लग्न आहे. कोएलला पहिल्या नवऱ्यापासून एक मूलही आहे. सध्या कोयल आणि अरिजीत एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.