Top Recommended Stories

Aryan Khan Drug Case: आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी NCB ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरण चार्जशीट अर्थात आरोपपत्र दाखल करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (Narcotics Control Bureau-NCB) 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Published: March 31, 2022 7:51 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Aryan Khan Drug Case: आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी NCB ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत
शाहरुख़ खान के बेटे आर्यन खान

Aryan Khan Drug Case: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरण चार्जशीट अर्थात आरोपपत्र दाखल करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (Narcotics Control Bureau-NCB) 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. NCB ने मुंबईची विशेष NDPS कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालवधी मागितला होता.

आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी NCB ने चार्जशीट 2 एप्रिलपर्यंत दाखल करणे अपेक्षीत आहे. परंतु, NCB ने सोमवारीच विशेष NDPS कोर्टात अर्ज केला होता. आर्यन खानशी संबंधित क्रूझ ड्रग्स प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी NCB ने अर्जाद्वारे केली होती. मात्र, विशेष NDPS कोर्टाने NCB ची मागणी फेटाळली आणि 60 दिवसांत चार्जशीट दाखल करण्याची निर्देश दिले आहेत. आर्यन खान अंमली पदार्थांचे सेवण आणि इतर प्रकरणात आरोपी आहे.

You may like to read

NCB च्या विशेष तपास पथक 2 एप्रिलपर्यंत या प्रकरणात चार्जशीट दाखल करणार होते. परंतु, केंद्रीय एजन्सीने न्यायमूर्ती व्ही.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अर्ज दाखल करून चार्जशीट दाखल करण्यासाठी अतिरिक्त 90 दिवसांचा कालावधी मिळावा, अशी विनंती केली होती. हे प्रकरण हायप्रोफाईल असून अद्याप तपास सुरू असल्याचे NCB ने अर्जात म्हटले होते. क्रिमिनल प्रोसिजर कोड (CRPC) नुसार, NCB ला ऑक्टोबर 2021 मध्ये FIR नोंदवल्यापासून 180 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणे अनिवार्य आहे.

दरम्यान, NCB ने आर्यन खानसह 19 जणांना क्रुझ ड्रग्स प्रकरणी आरोपी केले आहे. NCB ने 2 ऑक्टोबरला मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर एक क्रूझमध्ये ड्रग्स पार्टी करताना आर्यन खानला अटक केले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.