मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खानला सध्या आर्थर रोड जेलमध्ये (Arthar Road Jail) ठेवण्यात आले आहे. आर्यनला जामीन (Bail) मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण कोर्टाने बुधवारी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यावर ढकलली. याच दरम्यान आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमधील क्वारंटाइन बराकमध्ये (Quarantine barracks) होता. पण आता त्याचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या बराकमध्ये इतर कैद्यांसोबत राहावे लागणार आहे.Also Read - Ananya Panday Bridal Photoshoot: नववधूच्या रुपात अवतरली अनन्या पांडे, ब्रायडल फोटोशूटमुळे आली चर्चेत!

कोरोनामुळे तुरुंगामध्ये योग्य ती काळजी घेतली जात आहे. नव्या कैद्यांना जेलमध्ये आणल्यानंतर त्यांना इतर कैंद्यासोबत ठेवले जात नाही. त्यांना सुरुवातीला क्वारंटाईन बराकमध्ये ठेवले जाते. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये आणल्यापासून तो क्वारंटाइन बराकमध्ये होता. पण आता त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह (Corona Report Negative) आला आहे. त्यामुळे त्याला इतर कैद्यांसोबत दुसऱ्या बराकमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जेल प्रशासनाने दिली आहे. Also Read - Sooryavanshi Movie Release Date: अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' दिवाळीत करणार धमाका, 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!

आर्यन खानच्या जामीन अर्जावर (Bail Application) गेल्या काही दिवसांपासून विशेष न्यायालयामध्ये (special court) सुनावणी सुरु आहे. पण कोर्टाने अजून त्याला जामीन मंजूर केला नाही. बुधवारी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी जवळपास तीन तास चालली पण कोणताही निर्णय आला नाही. न्यायालयाने ही सुनावणी गुरुवारवर ढकलली त्यामुळे बुधवारची रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागली. जामीन अर्जाची नोटीस दिल्यानंतर एनसीबीच्या (NCB) वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ‘ड्रग्जच्या प्रकरणात अनेक जामीन याचिका प्रलंबित असल्याने एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी किमान एक आठवड्याचा अवधी पाहिजे.’ Also Read - Gadar 2 Motion Poster Release: 20 वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर धुमाकूळ घालायला येतोय गदर चित्रपटाचा सिक्वेल, मोशन पोस्टर रिलीज!