मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा (Bollywood Actor Akshay Kumar) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बेल बॉटम’चा (Bell Bottom) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच बेल बॉटमचं पहिलं गाणं ‘मैं तेरे बिन मरजावां’ (Tere Bin Marjaawan) रिलीज झाले आहे. चित्रपटाचं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याचं विशेष म्हणजे यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि वाणी कपूरची (Vaani Kapoor) लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.Also Read - Big Breaking: शिल्पा शेट्टीच्या पतीला मोठा दिलासा, राज कुंद्राला अखेर जामीन

‘मैं तेरे बिन मरजावां’ या रोमँटिक सॉन्गमध्ये वाणी कपूर आणि अक्षय कुमार ही जोडी एकदम फिट बसली आहे. दोघांमधली केमेस्ट्री जबरदस्त दिसत आहे. गुरजनर आणि असीस कौरनं हे गाणं गायलं असून या गाण्यावर आतापर्यंत 91,806 लाइक्स मिळाले आहेत. येत्या 19 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे. Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आधी गाण्याचं पोस्टर शेअर करून त्याच्या रिलीजची अनाउंसमेंट केली होती. ‘मैं तेरे बिन मरजावां वाणी कपूर. हमारी कहानी जानने के लिए जुड़े रहें.’, अशी टिप्पणी पोस्टर शेअर करत अक्षय कुमारनं केली होती. Also Read - Aishwarya Rai ची एकूण संपत्ती ऐकून गरगरेल तुमचं डोकं, एका क्लिकवर जाणून सबकुछ...