Top Recommended Stories

Bhabiji Ghar Par Hain: नेहा पेंडसे सोडतेय 'भाभीजी घर पर हैं' मालिका, आता कोण बनणार 'गोरी मेम'

Neha Pendse Will Quit Bhabiji Ghar Par Hain: छोट्या पडद्यावरील (Television) सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो (Comedy Show) 'भाभीजी घर पर हैं'च्या (Bhabiji Ghar Par Hain) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अत्रिनेत्री नेहा पेंडसे (Actress Neha Pendse) लवकरच या मालिकेला अलविदा म्हणणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनिता भाभीचा शोध सुरू झाला आहे.

Published: February 3, 2022 3:58 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Bhabiji Ghar Par Hain: नेहा पेंडसे सोडतेय 'भाभीजी घर पर हैं' मालिका, आता कोण बनणार 'गोरी मेम'

Neha Pendse Will Quit Bhabiji Ghar Par Hain: छोट्या पडद्यावरील (Television) सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो (Comedy Show) ‘भाभीजी घर पर हैं’च्या (Bhabiji Ghar Par Hain) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अत्रिनेत्री नेहा पेंडसे (Actress Neha Pendse) लवकरच या मालिकेला अलविदा म्हणणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनिता भाभीचा शोध सुरू झाला आहे.

Also Read:

‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) ही विनोदी मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अंगुरी भाभीची भूमिका असो किंवा तिवारी, अनिता भाभी किंवा दिलफेंक शेजारी म्हणून विभूती नारायण मिश्रा असो, या सर्व भूमिकांनी प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली आहे. परंतु, आता प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. नेहा पेंडसे ही लवकरच मालिकेला रामराम ठोकणार आहे.

You may like to read

दरअसल, सन 2020 मध्ये अनिता भाभी पात्र वठवणारी सौम्या टंडन (Saumya Tandon) हिने मालिका सोडली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) प्रेक्षकांच्या समोर आली होती. परंतु, आता नेहाने देखील ही मालिका सोडण्याचा (Neha Pendse Quit Bhabiji Ghar Par Hain) निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)


रिपोर्ट्सनुसार, नेहा पेंडसे ही ‘भाभीजी घर पर हैं’ मालिका सोडणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दुसरीकडे निर्माता अनिता भाभीच्या भूमिकेसाठी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची ऑडीशन घेतली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात अनिता भाभीच्या भूमिकेत नवी अभिनेत्री दिसू शकते.

दरम्यान, या मालिकेत अनिता भाभी आणि अंगुरी भाभी असे दोन मुख्य पात्र आहेत. आधी अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे हिने ही मालिका सोडली होती. आता नेहा देखील मालिका सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)


यूनिट हेडने दिलेली माहिती अशी, की अनिता भाभी या पात्रासाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू झाला आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची ऑडीशन देखील घेण्यात आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, अनिता भाभी या भूमिकेसाठी ‘पिया अलबेला’ची अभिनेत्री शीन दास हिचे नाव चर्चेत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 3, 2022 3:58 PM IST