BREAKING: बॉलिवूडमधील Most Loved Couple झाले विभक्त! मलायकानं खोलीत स्वत:ला घेतलं कोंडून

बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि मोस्ट लव्ह कपल अर्जुन कपूर मलायका अरोरा विभक्त झाले आहेत. अर्जुन आणि मलायकामध्ये ब्रेकअप झाले आहे.

Published: January 12, 2022 4:11 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

BREAKING: बॉलिवूडमधील Most Loved Couple झाले विभक्त! मलायकानं खोलीत स्वत:ला घेतलं कोंडून

Malaika Arora-Arjun Kapoor Have Separated after 4 years: बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि मोस्ट लव्ह कपल अर्जुन कपूर (Arjun Kapoor) मलायका अरोरा (Malaika Arora) विभक्त झाले आहेत. अर्जुन आणि मलायकामध्ये ब्रेकअप (Arjun Kapoor Malaika Arora breakup) झाले आहे. दोघे त्यांच्या रोमँटिक नात्यामुळे कायम चर्चेत असायचे. प्रत्येक पार्टीत दोघे सोबतच दिसायचे. इतके नाही तर लव्हली कपल न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration)आऊटिंगला देखील गेले होते. दोघांचे रोमँटिक आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.

Also Read:

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने त्यांच्या रोमँटिक नात्याला पूर्णविराम दिला आहे. आता दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. मलायका आणि अर्जुनमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. त्यावरून दोघांवर टीकेचा भडीमार देखील झाला होता. असे असताना देखील अर्जुन कायम होणाऱ्या टीकेकडे कायम दुर्लक्ष करत होता. मलायकावर आपले जीवापाड प्रेम असून त्याला वय महत्त्वाचं वाटत नाही, असे देखील अर्जुनने म्हटले होते.

आमची सहयोगी वेबसाईट ‘बॉलिवूड लाईफ’च्या (Bollywood Life) रिपोर्टनुसार, अर्जुन आणि मलायकाने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. मलायका हिने खोलीत स्वत:ला कोंडून घेतले आहे. जवळपास ती एक आठवड्यापासून घराबाहेर देखील पडलेली नाही. मलायकाने स्वत:ला जणू होम क्वारंटाईन करून घेतले आहे.


अर्जुनशी काडीमोड घेतल्यानंतर मलायकाला मोठा धक्का बसला आहे. या दु:खातून स्वत:ला सावरण्यासाठी मलायकाने खोलीत कोंडून घेतल्याचे समजते. दरम्यान, गेल्या वर्षी 1 जानेवारी 2021 रोजी मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अर्जुन कपूरसोबतचे नाते जगजाहीर केले होते. पंरतु आता मलायका आणि अर्जुन या लव्हली कपलने कुठे स्पॉट होणार नाही, अशी माहिती समजते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 4:11 PM IST