Top Recommended Stories

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने राखी सावंत संतापली, निर्मात्याने वापर केल्याचा केला आरोप!

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या निर्मात्यांनी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला मागच्या एपिसोडमध्ये बाहेरचा रस्ता दाखविला. या एलिमिनेशनमुळे राखीला मोठा धक्का बसला असून ती खूपच नाराज झाली आहे.

Published: January 29, 2022 1:17 PM IST

By Priya More | Edited by Priya More

Rakhi Sawant
Rakhi Sawant

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील (Television) प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रत रियालिटी शो बिग बॉस (Reality Show bigg boss) पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बॉस सीझन 15चा (Bigg Boss 15) ग्रँड फिनाले ( Bigg Boss 15 Grand Finale) 29 आणि 30 जानेवारी होणार आहे. बिग बॉसचा विनर कोण ठरणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच बिग बॉसच्या घरात वातावरण चांगलेच तापले आहे. घरामध्ये आता जे स्पर्धक राहिले आहेत ते विनर होण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. पण गेल्या काही दिवसात असं काही घडलं की ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. कमी मतं मिळाल्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी (Bigg Boss makers) बॉलिवूडची (Bollywood) ड्रामा क्वीन राखी सावंतला (Drama Queen Rakhi Sawant) मागच्या एपिसोडमध्ये बाहेरचा रस्ता दाखविला. या एलिमिनेशनमुळे राखीला मोठा धक्का बसला असून ती खूपच नाराज झाली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतने दुःख (Rakhi Sawant Upset) व्यक्त केले आहे. यासंदर्भात राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये राखी सावंत नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

You may like to read

बिग बॉसने वापर केलाचा राखीचा आरोप –

व्हायरल झालेल्या व्हिडिओत राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली की, बिग बॉस निर्मात्यांनी (bigg boss makers) माझा वापर केला आहे. राखीने भावनिक होत पुढे सांगितले की बिग बॉसचे निर्माते दरवर्षी मनोरंजनासाठी (Entertainment) माझा वापर करतात. मात्र कधी मला विनर होण्यासाठी पात्र मनात नाही. मी बिग बॉसची टिशू पेपर (tissue paper) नाही. मी जिवंत व्यक्ती आहे. जेव्हापर्यंत संत्रीत (orange) रस असतो तोपर्यंत बिग बॉस इंटरटेन्टमेंटसाठी पिळतात आणि याची साल फेकून देतात. मी काही संत्री, लिंबू किंवा टिशू पेपर नाही.’

हे सांगताना राखी सावंत खूपच भावुक (Rakhi Sawant emotional)झाल्याचे दिसत आहे. राखी सावंत पुढे म्हणाली की, बिग बॉसचे निर्माते जेव्हा पाहिजे तेव्हा माझा मनाप्रमाणे वापर करतात आणि फिनालेच्याआधी मला घराबाहेर काढतात.’ राखी पुढे हे देखील म्हणाली की, ‘मी या शोवर खूप प्रेम करते आणि मी विनर होण्याच्या लायक देखील आहे. मात्र निर्मात्यांना हे नको आहे.’ राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राखीच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट केला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.