मुंबई : टिव्हीवरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉस 15 (Bigg Boss 15) आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस 15चा नवा अवतार आजपासून वूट अ‍ॅपवरुन (Voot App) प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही पहिली वेळ आहे जेव्हा बिग बॉस शो टीव्ही ऐवजी ओटीटी अ‍ॅपवर (OTT App) सुरु करण्यात आला आहे. हा शो यावेळी सलमान खान (Actor Salman Khan) ऐवजी करण जोहर (Karan Johar) होस्ट करताना दिसणार आहे. या शोचा प्रोम समोर आला असून यामध्ये बिग बॉसच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे.Also Read - Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरामध्ये हे 9 सेलिब्रिटी करणार एन्ट्री, यावेळी देखील हा शो ठरणार सुपरहिट!

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

Also Read - Bigg Boss 15 Update: 'बीग बॉस 15'बाबत मोठी अपडेट; एवढे महिने चालणार सीजन, येणार नवे ट्विस्ट

बिग बॉस 15 पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून आजपासून त्यांना हा शो पाहता येणार आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाचे वाद, त्यांचे खेळ पाहयाला प्रेक्षकांना खूप आवडतात. वूटच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन (Voot Instagram Account) बिग बॉसचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बिग बॉसचे घर आतून कसे आहे ते दाखवण्यात आले आहे. हा प्रोम पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत.’, असं लिहिण्यात आले आहे.

बिग बॉसचा शो हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पाहायला मिळणार असला तरी 6 आठवड्यांनंतर हा शो टेलिव्हिजनवर पाहयला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अमित टंडन (Amit Tandon), अक्षरा सिंह (Akshara Shingh), राकेश बापट (Rakesh Bapat), नेहा मारदा (Neha Marada), शमिता शेट्टी (Shamita Shetty), प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal), उर्फी जावेद (Urfi Javed), मिलंद गाबा (Milin Gaba), पवित्रा लक्ष्मी (Pavitra Laxmi), अर्जुन बिजलानी (Arjun Bijwani), करण नाथ (Karan Nath), दिव्या अग्रवाल (Divya Agrawal), जीशान खान (Jishan Khan), सना मकबूल (Sana Makbul), रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit), नेहा भसीन (Neha bhasin) एन्ट्री घेणार आहेत.