Top Recommended Stories

Bigg Boss 15 Winner: 'बिग बॉस -15'च्या ट्रॉफीवर तेजस्वी प्रकाशनं कोरलं आपलं नाव, प्रतीक सेहजपालला दिली टक्कर

Bigg Boss 15 Winner: तेजस्वी ही प्रेक्षकांची खूप आवडती आहे. त्याचसोबत ती एक स्ट्रॉग स्पर्धक आहे आणि बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांसह तिने प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. बिग बॉसच्या घरातील तेजस्वी आणि करण कुंद्रा यांची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

Published: January 31, 2022 8:29 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Bigg Boss 15 Winner Tejasswi Prakash Lifts Trophy
Bigg Boss 15 Winner Tejasswi Prakash Lifts Trophy

Bigg Boss 15 Winner : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त असणारा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15) फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉसच्या 15व्या सीझनचा विनर कोण असेल (Bigg Boss 15 Winner) याकडे प्रेक्षकांचे आणि बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांचे लक्ष लागले होते. अखेर बिग बॉस 15च्या विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आहे. बिग बॉसची स्पर्धक मराठमोळी तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) बिग बॉसच्या 15व्या सीझनची ट्रॉफी (Bigg Boss Season 15 Trophy) आपल्या नावावर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

You may like to read

तेजस्वी प्रकाश म्हणजे सर्वांची लाडकी तेजाने बिग बॉसच्या सीझन 15चे फायनल स्पर्धक शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundra) आणि प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal) यांना हरवून ट्रॉफी जिंकली आहे. बिग बॉस 15ची ट्रॉफी जिंकण्याचे तेजस्वीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तेजस्वीने बिग बॉस सीझन 15ची ट्रॉफी आणि 40 लाख रुपये जिंकले आहेत. तेजस्वीच्या नावाची घोषणा होताच बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांना धक्का बसला तर काहींना आनंद झाला. तर तेजस्वीच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) तेजस्वीच्या चाहत्यांनी तिला खूप आधीच विजेता म्हणून घोषित केले होते. पण शेवटपर्यंत सर्वांच्या मनात धाकधूक होती कारण तेजस्वी आणि प्रतिक या दोघांपैकी प्रतिकला घरातील सर्व सदस्यांनी विनर होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगितले होते. पण अखेर या शोचा होस्ट सलमान खानने (Actor Salman Khan) बिग बॉस 15ची विजेती तेजस्वी प्रकाश असल्याचे जाहीर केले आणि सर्वांना धक्का बसला. तेजस्वी ही प्रेक्षकांची खूप आवडती आहे. त्याचसोबत ती एक स्ट्रॉग स्पर्धक आहे आणि बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांसह तिने प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. बिग बॉसच्या घरातील तेजस्वी आणि करण कुंद्रा यांची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

दरम्यान, तेजस्वी प्रकाशने टेलिव्हिजनची वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’मध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘संस्कार’, ‘स्वरागिनी’, ‘पहरेदार पिया की’, ‘रिश्ता’, ‘कर्णसंगिनी’ या मालिकांमध्ये देखील दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर तेजस्वी ‘खतरों के खिलाडी 10’ या रियालिटी शोमध्ये दिसली होती. छोट्या पडद्यावर तेजस्वी जरी संस्कारी आणि देसी अवतारामध्ये दिसत असली तरी सुद्धा ती खऱ्या आयुष्यामध्ये खूपच ग्लॅमरस आहे. बिग बॉस सीझन 15नंतर ती आता लवकरच ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.