मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान (Actor Aamir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या ( Aamir-Kiran Divorce) निर्णयाने बॉलिवूड विश्वासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर आणि किरणने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यामधील प्रेम आणि मैत्री (Love and Friendship) कायम असल्याची झलक तुम्हाला नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून (Viral Video) पाहायला मिळेल.Also Read - Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार!

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

Also Read - Dharmendra Kissing Scene: धर्मेंद्र यांनी आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंडसोबत दिला होता इंटिमेट किसिंग सीन, उडाली होती खळबळ...

आमिर खान आणि किरण राव सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या (Laal Singh Chaddha) शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. लडाखमध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. यावेळी आमिर आणि किरण फक्त एकत्र काम करत नाही तर खूप मस्ती सुद्धा करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. यातच दोघांचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आमिर खान आणि किरण लडाखमध्ये त्याठिकाणची पारंपारिक वेषभूषा करुन डान्स करताना दिसत आहेत. Also Read - Raj Kundra-Shilpa Shetty House: राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा आलिशान बंगला इतक्या कोटींचा, फोटो पाहून व्हाल थक्क!

आमिर खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आमिर खान आपली एक्स वाइफ किरण रावसोबत डान्स करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची शुटिंग लडाखच्या वाखा गावामध्ये सुरु आहे. या गावातील लोकांनी आमिर आणि किरण यांचे मनापासून स्वागत केले. गावकऱ्यांनी आमिर आणि किरण यांना लडाखमधील पारंपारिक कपडे घालायला दिली. ही कपडे घालून दोघांनीही याठिकाणी राहणाऱ्या गावऱ्यांसोबत फॉक डान्स केला. या व्हिडिओमध्ये आमिर आणि किरण दोघंही आनंदीत असल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, आमिर खानचे किरण रावसोबतचे हे दुसरे लग्न होते. त्याने आधीची पत्नी रीना दत्ताला (Reena Dutta) 2002 मध्ये घटस्फोट दिला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात किरण राव (Kiran Rao) आली आणि दोघांनी नंतर लग्न केले होते. पण 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिरने किरण रावला देखील घटस्फोट (Aamri khan and Kiran Rao divorce) दिला. दोघांनी संयुक्त स्टेटमेंट रिलीज करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते.