मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Actor Ajay Devgn) लवकरच अ‍ॅडव्हेंचर आणि सर्वाइवलिस्ट बेयर ग्रिल्ससोबत लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बियर ग्रिल्स’मध्ये (Into The Wild with Bear Grylls) स्टंट करताना दिसणार आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये अजय देवगणआधी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Bollywood Actor Akshay Kumar) आणि रजनीकांत (Rajinikanth) हे सहभागी झाले होते.Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

Also Read - Bigg Boss Season 15: बिग बॉस सीझन 15साठी सलमान खानने घेतले ऐवढं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क!

मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगण लवकरच ‘इनटू द वाइल्ड विथ बियर ग्रिल्स’ या शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरीने यासाठी अजय देवगणसोबत करार केला आहे. हा शो डिस्कव्हरी प्लस अ‍ॅपवर (discovery plus app) पाहायला मिळणार आहे. या शोसाठी अजय देवगण चार्टड विमानाने मालदीवला (maldives) रवाना झाला आहे. याठिकाणीच या शोचे शूटिंग होणार आहे. हा शो कधी प्रदर्शित होणार याबाबत काहीच माहिती सांगण्यात आली नाही. Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

दरम्यान, 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘मॅन व्हसेस वाइल्ड’ या शोमध्ये बियर ग्रिल्ससोबत दिसले होते. अक्षय कुमारने (Akshay Kumar) बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात (Bandipur National Park) आणि रजनिकांत (Rajinikanth) यांनी व्याघ्र प्रकल्पात (Tiger Project) ‘इनटू द वाइल्ड विथ बियर ग्रिल्स’ या शोसाठी शूटिंग केले होते. अक्षय कुमारने बियर ग्रिल्ससोबत जबरदस्त स्टंट केले होते. आता अभिनेता अजय देवगण या शोमध्ये सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद आहे. या शोची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.