Malaika Aroraसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत Arjun Kapoor म्हणाला - 'अफवांना इथं जागा नाही'

Malaika Arora-Arjun Kapoor Romantic Photo : अर्जुन कपूरने मलायकासोबतचा रोमँटिंक फोटो शेअर करत ब्रेकअपच्या चर्चांना स्वत: पूर्णविराम दिला आहे.

Updated: January 13, 2022 8:49 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

malika arora and arjun kapoor
malika arora and arjun kapoor

Malaika Arora-Arjun Kapoor Romantic Photo : बॉलिवूडची (Bollywood) सर्वात फेवरेट आणि चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora). प्रेक्षकांचे देखील हे सर्वात जास्त फेवरेट कपल आहे. अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्या रोमँटिंक फोटोंमुळे (Romantic Photo) नेहमीच चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांचे ब्रेकअप (Malaika-Arjun Breakup) झाले असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. दोघांचे ब्रेकअप झाल्याचे ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण खरंच दोघांचे ब्रेकअप झाले का याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण याच दरम्यान अर्जुन कपूरने मलायकासोबतचा रोमँटिंक फोटो शेअर करत या चर्चांना स्वत: पूर्णविराम दिला आहे.

Also Read:

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Arjun Kapoor Instagram Post) मलायकासोबतचा रोमँटिंक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने या पोस्टला जबरदस्त कॅप्शन देत सध्या मलायका आणि त्याच्या ब्रेकअपबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. आनंदी राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम.’ या कमेंटमध्ये अर्जुनने लव्ह इमोजी देखील पोस्ट केला आहे.

अर्जुन कपूरने शेअर केलेला मलाययकासोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral On Social Media) होत आहे. या फोटोंवर दोघांच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अर्जुन कपूरच्या या पोस्टवरुन मलायका आणि त्याचे ब्रेकअप झाले नसल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या फक्त अफवा सुरु असल्याचे दिसून येत आहे. अर्जुन कपूरच्या या पोस्टला 3 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अर्जुनच्या या पोस्टमुळे दोघांचे चाहते देखील आनंदीत झाले आहेत.

दरम्यान, मलायका अरोराने अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) लग्न केले होते. पण 19 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी 2017 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. या दोघांना 18 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. तो सध्या शिक्षणासाठी परदेशात राहतो. घटस्फोटानंतर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करु लागली. मलायका आणि अर्जुन हे दोघे 2018 पासून एकत्र आहेत. दोघांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिसून येते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 13, 2022 8:28 AM IST

Updated Date: January 13, 2022 8:49 AM IST