बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार आणि किलर डान्सर हृतिक रोशन (Hrithik Roshan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. हृतिक रोशन त्यांच्या डान्स स्टाईल आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच चर्चेत असतो. पण यावेळी हृतिक रोशन नाही तर त्याची आई पिंकी रोशन या (Pinky Roshan) चर्चेमध्ये आल्या आहे. हृतिक रोशन आपल्या जबरदस्त स्टंटमुळे प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का त्याची ६६ वर्षांची आई सुद्धा त्याच्यासारखी बिधनास्त स्टंट करते. सोशल मीडियावर हृतिकच्या आईचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Pinky Roshan Viral Video) होत आहे. हा व्हडिओ पाहून नेटिझन्स देखील आश्चर्यचकित झाले आहेत.Also Read - ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये Mouni Roy चे बोल्ड फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमँटिक पोझ!

Also Read - Cruise Drugs Case : क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा, एनसीबीने दिली क्लिनचीट!

हृतिक रोशनची आई पिंकी रोशनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पिंकी रोशन स्विमिंग पूलमध्ये (Swiming Pool) खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. त्यांनी दोन वेगवेगळे स्टंट केले आहे. एका स्टंटमध्ये त्या दोन्ही हात जोडून पाण्याच्या आतमध्ये जातात. पाण्यामध्ये २० सेकंद थांबून बाहेर येतात. ६६ व्या वर्षी एवढ्यावेळ पाण्यात श्वास रोखून थांबून त्यांनी हा स्टंट पूर्ण केला आहे. तर त्यांनी आणखी एक जबरदस्त स्टंट केला आहे. पिंकी रोशन यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती या व्हिडिओत दिसत आहे ती व्यक्ती त्यांच्याकडून हा स्टंट पूर्ण करुन घेताना दिसत आहे. Also Read - Anushka Sharma चा ब्लॅक कटआऊट ड्रेसमध्ये बोल्ड अवतार, फोटो पाहून विराट झाला क्लिन बोल्ड!

६६ व्या वर्षांमध्ये हृतिक रोशनच्या आईची ही हिंमत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर पिंकी रोशन यांनी अशा प्रकारचे आणखी काही वॉटर स्टंटचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांना या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. राकेश रोशन यांच्या पत्नी पिंकी रोशन या देखील एका प्रतिष्ठित फिल्मी कुटुंबाशी संबंधित आहेत. राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि पिंकी रोशन 1969 मध्ये विवाहबंधनात अडकले होते.