मुंबई: बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय आणि हटके पर्सनालिटीच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खान (Bollywood Actor Irrfan Khan) याचा विसर पडणं इतकं सोपं नाही आहे. आजच्या एक वर्षापूर्वी इरफान खान यानं जगाला अलविदा केलं होतं.Also Read - Sonam Kapoor ने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, क्युट फोटोंना मिळतेय पसंती!

मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Hospital Mumbai) 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खान (Irrfan Khan Death Anniversary) यानं अखेरचा श्वास घेतला होता. कॅन्सरवर उपचार सुरू असताना इरफानला कोलन इन्फेक्शन झालं होतं आणि त्याची प्राणज्योत मालवली. बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood to Hollywood) अशी झेप घेतलेल्या इरफान खानचं आज पुण्यस्मरण आहे. टीव्ही मालिकांद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इरफान यानं भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं होतं. Also Read - कान्समध्ये Deepika Padukone ला पाहून या व्यक्तीचं सुटलं नियंत्रण, फोटो काढण्याच्या बहाण्याने केलं किस!

Irrfan Khan Death Anniversary

‘पठाणच्या घरात जन्मला ब्राह्मण’

आज आम्ही आपल्याला इरफान खानच्या जीवनातील काही रोचक किस्से सांगणार आहोत. (Irrfan Khan unknown Facts)  पठाण कुटुंबात जन्मलेला इरफान खान शुद्ध शाकाहारी होता. साहबजादे इरफान अली खान (Sahabjade Irrfan Ali Khan)  असं त्यांच पूर्ण नाव होतं. इरफानचे वडील जागीरदार खान (Jagirdar Khan) यांचा टायरचा व्यवसाय होता. पठाण कुटुंबातील असूनही इरफान यानं कधीही मासंहार केला नाही. म्हणून ‘पठाणच्या घरात जन्मला ब्राह्मण’ असं म्हणत इरफानचे वडील त्यांची कायम चेष्टा करत होते. Also Read - जिममध्ये Disha Patani ची फ्री स्टाईल फायटिंग, छेड काढणाऱ्याला धू धू धुतले!

Irrfan Khan Death Anniversary02

प्रेमविवाहाला होता कडाडून विरोध…

इरफान खान यांनं 1995 मध्ये सुतापा सिकंदरशी (Sutapa Sikandar) प्रेमविवाह केला होता. इरफान आणि सुतापाची पहिली भेट ड्रामा स्कूलमध्ये (Drama School) झाली होती. सुतापा देखील इरफानप्रमाणे ड्रामा स्कूलमध्ये होती. तिथे दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. इरफान आणि सुतापा हिनं लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या विवाहाला कडाडून विरोध झाला होता. सुतापाचे नातेवाईक या लग्नाच्या विरोधात होते.