Irrfan Khan Birthday: मृत्यूच्या एक दिवस आधी इरफानने... पत्नीने सांगितलेला किस्सा ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

इरफानच्या वाढदिवशी त्याची पत्नी सुतापा हिने पतीच्या गोड आठवणींना उजाळा मिळवून दिला आहे.

Updated: January 7, 2022 3:03 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Irrfan Khan Birthday: मृत्यूच्या एक दिवस आधी इरफानने... पत्नीने सांगितलेला किस्सा ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

Irrfan Khan Birthday: दिवंगत अभिनेता इरफान खान (Bollywood Actor Irrfan Khan) याने बॉलिवूडला अनेक चित्रपट दिले. अभिनयाच्या दमावर इरफानने मोठी उंची देखील गाठली होती. त्याची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली. परंतु कॅन्सरने (Cancer) इरफानला चाहत्यांपासून हिरावून नेले. आज इरफान हयात नसला तरी त्याची जागा कोणीही घेऊ शकलेला नाही. इरफानने एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. आज इरफानच्या मृत्यूनंतर दीड वर्षांनी त्याची पत्नी सुतपा सिकदर (Sutpa Sikdar) हिने त्याच्या वाढदिवशी एक किस्सा सांगितला आहे, तो ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहाणार नाही.

Also Read:

शुद्धीवर नव्हता तरीही ऐकत होता गाणे..

सुतापा सिकदर हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, इरफानच्या काही मित्रांनी त्याच्या आवडीचे काही गीत गायिले होते. इरफान तेव्हा शुद्धीवर नव्हता. तरी तो गाणे ऐकत होता. याचा पुरावा म्हणजे त्याचे डोळे. त्याच्या डोळ्यातील अश्रु थांबण्याचे नाव घेत नव्हते.

मृत्यूच्या एकदिवस आधी ऐकले होते पत्नीकडून गाणे…

आमची सहयोगी वेबसाइट DNA ने दिलेल्या वृत्तानुसार, इरफानच्या वाढदिवशी त्याची पत्नी सुतापा हिने पतीच्या गोड आठवणींना उजाळा मिळवून दिला आहे. सुतापाने सांगितले की, इरफानची शेवटी घटिका जवळ आली होती आणि तो माझ्याकडून गाणे ऐकत होता. ‘झूला किने डाला रे, अमरैया, झूले मोरा सैयां, लूं मैं बलियां … उमराव जानमधील, ‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो’ (वो कौन थी?), ‘आज जाने की ज़िद ना करो…’ हे गाणे मी त्याच्यासाठी गायले होते, असे सुतापाने सांगितले.

2018 मध्ये घेतला होता ब्रेक

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाल्यानंतर इरफान खान याने 2018 मध्ये अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. सन 2019 मध्ये आलेला ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये इरफान शेवटचं दिसला होता. इरफानच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदर, बबील आणि अयान ही दोन मुले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 3:01 PM IST

Updated Date: January 7, 2022 3:03 PM IST