मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख (Actor Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia Deshmukh) यांच्या घरी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. रितेश देशमुखच्या घरी गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) खूपच धमाल असते. हे आपण दरवर्षी पाहतो कारण त्याच्या मुलांना देखील बाप्पाची सेवा करायला खूप आवडते. यावर्षी घरामध्ये गणपती बाप्पाचे (ganeshotsav 2021) आगमन झाल्यानंतर रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Also Read - Bigg Boss Season 15: बिग बॉस सीझन 15साठी सलमान खानने घेतले ऐवढं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क!

रितेश देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Riteish Deshmukh instagram Account) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची दोन्ही मुलं रियान आणि राहिल (Riyan and rahil) दिसत आहे. दोघांनी देखील एक सारखे कपडे घातले आहेत. दोघांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पजामा आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे. दोघं देखील खूपच क्यूट दिसत आहेत. रियान आणि राहिल गणपती बाप्पाची आरती म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत रितेशने कॅप्शनमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ असे लिहिले आहे. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्याला पसंती दिली आहे. या व्हिडिओवर कमेंटस करत नेटिझन्सनी रितेश आणि जेनेलियाचे खूपच कौतुक केले आहे. त्याचसोबत ते रियान आणि राहिल याचे देखील कौतुक करत आहेत. एकाने कमेंट करत ‘खूप चांगली गोष्ट आहे, मुलांना आपल्या धर्माविषयी माहित असायला पाहिजे.’ असे म्हटले आहेत. तर दुसऱ्याने ‘व्वा तुम्ही दोघांनी मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत, देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहो.’, अशी कमेंट केली आहे.