Top Recommended Stories

Tadap Releasing Date: सुनिल शेट्टीचा मुलगा अहानचा पहिला चित्रपट 'तडप' या दिवशी होणार रिलीज!

नाडियावाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटात अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.

Updated: August 25, 2021 9:59 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Tadap Poster
Tadap Poster

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीचा ( Actor Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Actor Ahan Shetty) पहिला चित्रपट ‘तडप – एक अविश्वसनीय प्रेम कहाणी’ (Tadap Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. तडप चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नाडियावाला ग्रँडसन (Nadiadwala Grandson) एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटात अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया (Actress Tara Sutaria) मुख्य भूमिकेत आहे.

Also Read:

You may like to read

मंगळवारी नाडियावाला ग्रँडसनने (Nadiadwala Grandson Instagram) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात घोषणा केली. या इन्स्टा पोस्टमध्ये (Insta Post) असे म्हटले आहे की, ‘मोठ्या पडद्यावर ही जादू पाहा. साजिद नाडियावालाचा ‘तडप’ 3 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात येत आहे. ही एक अविश्वसनीय प्रेम कहाणी आहे. ज्याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे.’

View this post on Instagram

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

तर दुसरीकडे अहान शेट्टीने देखील इन्स्टाग्रामवर (Ahan Shetty Instagram) तडप चित्रपटाचा पोस्टर पोस्ट करत प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये हॅशटॅग तडप 03/12/21 असे लिहिले आहे. तडप चित्रपटाच्या माध्यमातून अहान शेट्टी आणि तारा सुतारिया ही एक नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तडप चित्रपटातील अहानच्या फर्स्ट लूकने (First Look) प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली होती.

तडप चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता होती. अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आल्यामुळे प्रेक्षक आनंदी झाले आहेत. ‘तडप’ चित्रपट तेलुगू हिट रोमँटिक एक्शन ड्रामा फिल्म ‘आरएक्स 100’चा रीमेक आहे. ज्यामध्ये कार्तिकेय गुम्माकोंडा, पायल राजपूत, राव रमेश आणि रामकी मुख्य भूमिकेत आहेत. हा तेलुगू चित्रपट खूपच सुपरहिट ठरला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 25, 2021 9:57 AM IST

Updated Date: August 25, 2021 9:59 AM IST