मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात शिल्पा शेट्टीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, शिल्पा शेट्टी ही देखील या मॉड्यूलची सक्रीय सदस्य होती आणि ती पती राज कुंद्रासोबत हे काम करत होती. या प्रकरणी शिल्पा शेट्टी देखील चौकश्यांच्या फेऱ्यांमध्ये अडकली आहे. शिल्पा शेट्टीने याप्रकरणी आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण सोमवारी शिल्पाने याप्रकरणी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे. शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. ‘मी सध्या या प्रकरणावर काहीही बोलणार नाहीय, कारण हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.’, असे शिल्पाने म्हटले आहे.Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

Also Read - Raj Kundra pornography case: राज कुंद्राविरोधात 1500 पानांचं आरोपपत्र, शिल्पा शेट्टीसह 43 जणांची साक्ष

शिल्पा शेट्टीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट (Shilpa Shetty Twitter Post) करत या प्रकरणावर आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. तिने असे म्हटले आहे की, ‘हो, मागील काही दिवस माझ्यासाठी अस्वस्थ करणारे होते. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मला ट्रोल करण्यात आलं आहे. फक्त मलाच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही या प्रकरणात उगाच ओढण्यात आले आहे. मी अद्याप या प्रकरणी काहीही बोलले नाहीय, पुढेही बोलणार नाही. कारण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावतीने चुकीची वक्तव्य लिहिणे थांबवा.’ Also Read - 'Into The Wild with Bear Grylls' या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार अजय देवगण!

शिल्पाने पुढे असे म्हटले आहे की, ‘माझा विचार हा आहे की, कोणाकडे तक्रार करू नका, कोणालाही समजावू नका. मला पूर्ण विश्वास आहे की याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल. मी फक्त एवढंच म्हणू शकते की या प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि मला मुंबई पोलीस आणि न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे.’

शिल्पाने सर्वांना आवाहन केले आहे की, ‘एक आई म्हणून, मी माझ्या मुलांच्या प्रायव्हसीसाठी विनंती करते. आमच्याबाबत कोणतीही माहिती पडताळून पाहिल्याशिवाय छापू नका. मी भारताची नागरिक आहे आणि देशातील सर्व कायद्यांचे मी पालन करते. मी 29 वर्षांपासून मेहनतीने काम केलेय.’ शिल्पा शेट्टीने शेवटी असे म्हटले आहे की, ‘मला आणि माझ्या कुटुंबाला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल (media trial) करु नका. कायद्याला आपलं काम करु द्या. सत्यमेव जयते!’