By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
लग्नानंतर Alia Bhatt ला मिळाली गुडन्यूज, इन्स्टाच्या टॉप- 5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथ्या स्थानावर!
Instagrams Lst Oft Top 5 Influencers : इन्स्टाग्रामच्या टॉप -5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये आपल्या नावाचा सहभाग असणारी आलिया भट्ट ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.

Instagrams Lst Oft Top 5 Influencers : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) नुकताच तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न केले. लग्नानंतर आलिया (Alia Bhatt- Ranbir Kapoor Wedding) भट्ट खूपच खुश आहे. अशामध्ये तिच्या आनंदामध्ये आणखी भर पडली आहे. आलियाला गुड न्यूज मिळाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रीय असणाऱ्या आलियाची नेहमीच चर्चा होत असते. याच आलियाचे नाव आता इन्स्टाग्रामच्या (Alia Bhatt Instagram) टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सहभागी झाले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या टॉप -5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये आपल्या नावाचा सहभाग असणारी आलिया भट्ट ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये पहिले स्थान हॉलीवुड स्टार जेंडायाने मिळवले आहे तर दुसरे स्थान टॉम हॉलंड याने मिळवले आहे. तर या यादीमध्ये विल स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे आणि जेनिफर लोपेझ पाचव्या स्थानावर आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आलिया भट्ट ही सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आलियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिने पोस्ट केलेले प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ याला खूप चांगली पसंती मिळत असते. काह दिवसांपूर्वी आलियाच्या ‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या